Headlines

“महेंद्रसिंह धोनी, विराटची पूजा करणं बंद करा”; गौतम गंभीर का भडकला? जाणून घ्या …

[ad_1]

भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक असलेल्या गौतम गंभीरने (gautam gambhir) पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) ‘हिरो’ संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांनी ठरावीक खेळाडूंची पूजा करणे बंद करावे, अन्यथा क्रिकेटचे भले होणार नाही, असा इशाराच गौतम गंभीरने (gautam gambhir) दिला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूला हिरो (Hero) बनवण्याच्या संस्कृतीवर गौतम गंभीरने (gautam gambhir) जोरदार टीका केली आहे. विराट कोहली (virat kohli), महेंद्रसिंह धोनीबद्दल (mahendra singh dhoni) चाहत्यांना जशी उत्कटता आहे, तशीच इतर खेळाडूंसाठीही असली पाहिजे, असे गंभीरचे मत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये (dressing room) तुम्ही राक्षस निर्माण करू नका, आधी एमएस धोनी (MS Dhoni) होता आणि आता विराट कोहली (virat kohli) आहे, असेही गंभीर म्हणाला. एकच राक्षस असावा, तो म्हणजे भारतीय क्रिकेट (indian cricket), खेळाडू नाही.

गौतम गंभीर म्हणाला की, “जेव्हा तुम्ही एखाद्याची पूजा करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यासोबत खेळणारे अनेक खेळाडू तिथेच संपतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. आधी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) होता आणि आता विराट कोहली आहे.  जेव्हा विराट कोहलीने टी-20 सामन्यात शतक झळकावले तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या (bhuvneshwar kumar) दमदार स्पेलबद्दल कोणीही  बोललं नाही.”

“कॉमेंट्रीमध्ये (commentary) मी एकटाच होतो जो वारंवार नमूद करायचो की चार षटकांत 4 धावा देऊन 5 बळी घेणे सोपे नाही. भारताला (India) एखाद्या खेळाडूची पूजा करण्याच्या वृत्तीमधून बाहेर यावं लागेल. तुम्हाला फक्त भारतीय क्रिकेटलाच (cricket) सर्वात मोठं समजावे लागेल,” असेही गौतम गंभीर म्हणाला.

ही संस्कृती कशी सुरू झाली असा प्रश्न विचारला असता गौतम गंभीर सोशल मीडियावर भडकला. “अशा गोष्टी सोशल मीडियापासून सुरू होतात, जिथे बहुतेक बनावट चाहते असतात. तुमचे किती फॉलोअर्स आहेत याच्या आधारावरच तुमची पात्रता ठरवली जाते.  1983 मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा कपिल देव (kapil dev) यांच्यासोबत असे घडले. त्यानंतर 2007, 2011 विश्वचषकातही असाच प्रकार घडला आणि कर्णधाराला सर्वस्व मानन्यात आलं, असं गौतम गंभीर म्हणाला.

गौतम गंभीरने अनेकवेळा याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वारंवार महेंद्रसिंह धोनीच्या खेळीला श्रेय दिल्यावरुनही गौतम गंभीरने अनेकवेळा आक्षेप घेत तो पूर्णपणे सांघिक प्रयत्न असल्याचे म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *