महाठग सुकेश चंद्रशेखरचा लेटर बॉम्ब, अभिनेत्री नोरा फतेहीबाबत केला मोठा गौप्यस्फोट


Sukesh Chandrashekhar Letter : तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) आणखी एक लेटर समोर आलं आहे. यात त्याने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीबाबत (Nora Fatehi) मोठा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि आपण रिलेशनमध्ये होतो, पण या नात्यावर नोराला आक्षेप होता. नोरा जॅकलीचा हेवा करत होती, तसंच जॅकलीनविरोधात ती मला नेहमी भडकावत होती असं सुकेश चंद्रशेखरने या पत्रात म्हटलं आहे. 

 नोरा फतेहीवर गंभीर आरोप
200 कोटी रुपयांच्या मनी लॉण्ड्रींगप्रकरणी (Money Laundering) सुकेश चंद्रशेखर तुरुंगात बंद आहे. तुरुंगातून त्याने याआधीही सनसनीखेज पत्र लिहिली आहेत. यावेळच्या पत्रात सुकेशने नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिसदरम्यानचा वाद (Controversy between Nora Fatehi and Jacqueline Fernandez) चव्हाट्यावर आणला आहे. सुकेशने नोरावर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे ब्युरोसमोर (EOW) नोराने आपला जबाब बदलल्याचा दावा सुकेशने केला आहे. जॅकलीशनशी संबंध ठेऊ नयेत असं नोराला वाटत होतं, यावरुन आपण नोराला त्रास देणं बंद कर असं सांगितल्याचंही सुकेश या पत्रात म्हटलं आहे. निक्की तम्बोली आणि चाहत खन्ना हे केवळ व्यवहारीक सहकारी होते आणि ते माझ्या प्रोडक्शनमध्ये (Production House) काम करत असल्याचं सुकेश म्हटलं आहे. 

नोराचा इरादा वेगळा होता
जॅकलीनला सोडून सुकेशने नोराला डेट करावं, यासाटी ती दिवसातून आपल्याला कमीतकमी दहा ते बारा वेळा फोन करायची, पण आपण त्या कॉलला प्रतिसाद दिला नाही, असंही सुकेशने म्हटलं आहे. नोराने जॅकलिनवर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचंही सुकेशने सांगितलं. नोराने ईडी आणि आर्थिक गुन्हे पथकासमोर वेगवेगळे जबाब नोंदवले, यावरुन ती सर्व बनावट कहाण्या रचत असल्याचं समोर येतंय, माझ्याकडून महागडी कार गिफ्ट घेण्याबद्दलही नोरा खोटं बोलत असल्याचं सुकेशने म्हटलं आहे. नोराची जेव्हा भेट झाली त्यावेळी तिच्याकडे एक साधी कार होती, तिच्यासाठी आम्ही एक लक्झरी कार पाहिली होती, त्याचा स्क्रिन शॉट ईडीकडे असल्याचंही सुकेशने म्हटलंय.

नोराला दिले महागडे गिफ्ट्स
नोराला मी रेंज रोवर गिफ्ट देणार होतो, पण ती स्टॉकमध्ये नव्हती. म्हणून मी तिला S सीरिज BMW ही महागडी कार गिफ्ट केली. ही कार बराच काळ तिच्याकडे होती. याशिवाय नोरा मला महागड्या बॅग आणि दागिन्यांचे फोटो मोबाईलवर पाठवत होती, त्या सर्व गोष्टी मी तिला गिफ्ट केली असून त्या सर्व गोष्टी ती अजूनही वापरते असंही आपल्या पत्रात सुकेशने म्हटलंय. नोराला आपण जवळपास 2 कोटी रुपयांची गिफ्ट दिल्या असून याची कोणतंही बिलं तिच्याकडे नाहीत, कारण या वस्तून तीने खरेदी केलेल्या नाहीत, असा गौप्यस्फोटही सुकेश चंद्रशेखरने केला आहे. Source link

Leave a Reply