Headlines

Maharashtra Political Crisis: “ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी, त्यांचा शब्द…” | PM Modi Should intervene between Eknath Shinde And Uddhav Thackeray say Shivsena leader Deepali Sayed scsg 91

[ad_1]

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील दोन आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींची चर्चा देशभरात होत असतानाच आता नव्याने सत्तेत आलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनी ज्यांच्याविरोधात बंडखोरी त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करण्याची मागणी करण्यात आलीय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या एका महिला नेत्याने ही मागणी केली असून सध्या या मागणीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे.

नक्की वाचा >> “मी पत्र दिलं होतं तेव्हा…”; २०२१ च्या ‘त्या’ पत्राची आठवण करुन देत बंडखोरी करणाऱ्या प्रताप सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना टोला

मोदींचा शब्द…
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आता महाराष्ट्रातील राजकारणामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केलीय. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन मुख्यमंत्री झालेले शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये मोदींनी समेट घडवून आणावी अशी मागणी दीपाली यांनी ट्विटरवरुन केलीय. दोन्ही नेते मोदींचा शब्द टाळणार नाहीत अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> शिवसेना म्हणते, “…तर बाळासाहेबांनी ‘व्वा रे माझ्या मर्दांनो!’ म्हणत बंडखोरांची पाठ थोपटली असती”

पक्षाबाहेरून नरेंद्र मोदींनी…
“शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे,” असं दीपाली यांनी आपल्या ट्विटच्या पहिल्याच ओळीत म्हटलंय. “उद्धव (ठाकरे) व (एकनाथ) शिंदे यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षाबाहेरून नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी,” अशी मागणीही दीपाली यांनी या ट्विटमधून केलीय. “मोदींचा शब्द उद्धव (ठाकरे) व (एकनाथ) शिंदे टाळणार नाहीत हिच एक आशा आहे,” असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. विशेष म्हणजे शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जाण्याच्या पूर्वसंध्येलाच दीपाली यांनी हे ट्विट केलं आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदे आणि फडणवीस हे पंतप्रधान मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण शिंदेंनी ‘करुन दाखवलं!’

भाजपा शत्रू नाही पण…
दोनच दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी केलेल्या एका ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आपल्याला कालही आदरणीय होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, असं नमूद केलं आहे. “शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या आणि भाजपाचे अन्य दोन वाचाळवीर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत असतील तर त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्यातली शिवसेना आजही जिवंत आहे. उगाच कळ काढू नका. एकनाथ शिंदेंनी भाजपावर दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका”, असं म्हटलं होतं.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

“भाजपा आमची शत्रू नाही. त्यांच्याविरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंदही नाही. पण वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण भाजपाने याची दखल घेणं गरजेचं आहे”, असा सूचक उल्लेख दीपाली सय्यद यांनी ट्विट केलेल्या पत्रात केलेला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *