maharashtra women commission send notice maharashtra police dgp order action against abdul sattar ssa 97राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खालच्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तार यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील निवासस्थानावर दगडफेकही करण्यात आली. यानंतर आता या वक्तव्याची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली असून, कारवाईचे निर्देश दिले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहलं आहे. त्यात “मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्धार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे.”

“याप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशी सूचना आयोगाकडून देण्यात आली आहे,” असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.

हेही वाचा : सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार? दीपक केसरकर म्हणाले, “देशद्रोहाचे…”

अब्दुल सत्तार काय म्हणाले होते?

सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर करण्यात आली होती. त्यावर तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं सुप्रिया सुळेंनी म्हणाल्या होत्या. यावरून औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावरती उत्तर देताना सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भि**** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ,” असे वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं होतं.Source link

Leave a Reply