Headlines

Maharashtra rain news updates political crisis live updates cabinet expansion aarey car shed shivsena bjp bmc election updates

[ad_1]

Maharashtra Live News Today : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी इत्यादींच्या मुद्य्यांवरून केंद्र सरकार विरोधात ठाणे शहरात काँग्रेसकडून आज (सोमवार) दुपारी ‘जन आंदोलन’ करण्यात येणार आहे. “देशात वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, ढासळलेली अर्थव्यवस्था, अग्निपथ योजनेद्वारे तरुणांचे खच्चीकरण, जीएसटी करामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे. या सर्वाचा विरोध करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काँग्रेस जनआंदोलन करणार आहे.”, असे ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यांनी कळविले आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.

महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Latest News Live Updates, 08 August 2022 : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *