: Maharashtra political updates shivsena leader sanjay raut bail | BJP NCP MNS Congress Latest Marathi News Today 11 November 2022


Mumbai-Maharashtra Political Crisis Live Updates, 11 November 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

“मुंबई-महाराष्ट्रातील भाजपाचे किमान सात मंत्री, १५ आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात आत जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत, पण ‘ईडी’ स्वतःच आरोपींची निवड करते हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने संजय राऊत यांच्या सुटकेनंतर भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ बरखास्त करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून राष्ट्रीय कुस्ती महासंघाला तडाखा दिला. महासंघाने कुस्तीगीर संघ अथवा कार्यकारिणीतील सदस्यांची बाजू ऐकून न घेताच संघ बरखास्त करण्याचा घेतलेला निर्णय हा मनमानी असल्याचे ताशेरे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या एकलपीठाने आदेशात ओढले आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Live Updates

Pune-Mumbai Breaking News Live, 11 November 2022 : महाराष्ट्रातील राजकीय आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

मुंबई-गोवा महामार्गावर नदीपात्रात सापडलेली स्फोटके खोटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे पेणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.Source link

Leave a Reply