Maharashtra political crisis sc hearing live | Pune breaking news today | Maharashtra cold updates


Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis Live, 01 November 2022 : राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार होती. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश होता. मात्र आता ही सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

याशिवाय मुंबईत आजपासून (१ नोव्हेंबर) चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट सक्तीचा असणार आहे. आजपासून मुंबईत चारचाकी वाहनामधून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांचा हा नियम सर्वांसाठी चारचाकी वाहनधारकांसह प्रवाशांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे.

‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी विषाणूच्या जनुकीय बदलाची माहिती घेतली जाणार असून त्यासाठी जनावरांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार शक्ती किती वाढली याचेही मूल्यमापन केले जाणार आहे.

यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी सविस्तर वाचा फक्त एकाच क्लिकरवर

Live Updates

Maharashtra Live News Updates : यासह राज्यभरातील विविध क्षेत्रातील घडामोडी सविस्तर वाचा फक्त एकाच क्लिकरवर

राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे.Source link

Leave a Reply