Maharashtra political crisis live news shinde vs thackeray real shivsena row dasara melava marathi dandiya in mumbai latest updates in marathi

[ad_1]

Maharashtra Breaking News Live Updates, 29 September 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे.

तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीवरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील त्यांच्या या विधानानंतर आता अजून एका उपहासात्मक विधानाची चर्चा आहे. बीडच्याच एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी ‘मी सध्या बेरोजगारच आहे’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. यावेळी पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचाही समाचार घेतला.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Mumbai-Maharashtra Latest News Updates, 29 September 2022 : राज्यातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी आणि अन्य बातम्या वाचा एकाच ठिकाणी 

सर्वोच्च न्यायालयातील पहिला निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्याने शिवसेनेनं पहिल्यांदाच पक्ष म्हणून आपली बाजू मांडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून ‘सर्व प्रकारच्या लढाईस आम्ही सज्ज आहोत’ असं सांगत शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोरील लढाईसाठीची तयारी दर्शवली आहे. इतकंच नाही तर शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका करताना, “आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *