Headlines

: Maharashtra News live political crisis eknath shinde rebel mla sanjay raut ed updates uddhav thackeray shivsena bjp marathi news today

[ad_1]

Maharashtra News Live Updates, 1 August 2022 : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापेमारी करून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील दहा लाखाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहितीही समोर येत आहे. संबंधित दहा लाख रुपये अयोध्या दौऱ्यातून उरलेले असून ती रक्कम पक्ष कार्यालयात जमा करण्यासाठी ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे. तसेच राऊतांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. राऊत यांना अटक केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादनंतर ते पुण्यात देखील शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील आणि देशातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra News Today, 1 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

Maharashtra News Live Updates Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *