Headlines

Maharashtra latest marathi news political crisis updates ganesh utsav 2022 mumbai pune latest news | weather updates shivsena sambhaji brigade yuti news 29 August 2022

[ad_1]

Maharashtra News Today Live, 29 August 2022 : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने सत्तापेच कायम आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं भाकीत अमोल मिटकरी यांनी केलं आहे. बोदवड येथे रोहिणी खडसे यांनी संवाद यात्रेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

मुंबईतील एसी लोकल विरोधात प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसी लोकलमुळे इतर रेल्वे गाड्या रद्द होत असल्याने मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा खोळंबा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. गरीब माणसाला जर एसी परवडत नसेल, तर एसी फेकू आंदोलन करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे. हा प्रश्न केवळ कळवा-मुंब्रा पुरता मर्यादीत नाही. हे आंदोलन गरीब विरुद्ध एअर कंडिशन असे असल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Live News Today : शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले…

Maharashtra Breaking News Live Today

मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील फेरविचार याचिकेवर निकाल आल्यानंतरच मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयात गेले काही महिने प्रलंबित असून त्यावर लवकर सुनावणीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून नवीन सांख्यिकी व कायदेशीर तपशीलही सादर करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *