Headlines

Maharashtra Government should bring ANTI CONVERSION LAW like UP tweets nitesh rane scsg 91

[ad_1]

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आरेमधील मेट्रोच्या कारशेडपासून ते नामांतरणापर्यंतच्या अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही बंडखोरी करुन भाजपासोबत आल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जातंय. अशातच आता या नव्या सरकारकडे भाजपाच्या एका आमदाराने धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणण्याची मागणी केलीय.

नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आम्ही बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांच्याकडून मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा सांगण्यात आलं. तर दुसरीकडे हे सरकार सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यापासून नव्याने निर्णय घेण्याच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे. अशातच आता भाजपाचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राज्यात आता ‘भगवाधारी सरकार’ असल्याने धर्मांतर विरोधी कायदा आणावा अशी मागणी केलीय.

नक्की वाचा >> “उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते…”; निलेश राणेंचा टोला

नितेश राणेंनी ट्वीटरवरुन यासंदर्भातील भाष्य केलं आहे. “आता महाराष्ट्रात भगवाधारी सरकार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा हीच वेळ आहे,” असं नितेश म्हणाले आहेत. “आपण भोळ्या महिलांना यामध्ये अडकण्यापासून आणि त्यामधून होणाऱ्या छळपासून वाचलं पाहिजे,” असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. तर ट्वीटच्या शेवटी त्यांनी, “लवकरच हा कायदा आणूयात, जय श्रीराम!” असं म्हणत हसणारे इमोंजी पोस्ट केले आहेत.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का?; सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर करत नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

देशात अनेक ठिकाणी सक्तीने धर्मांतर होत असल्याचे दावे वारंवार केले जातात. अशी काही प्रकरणं समोर देखील आली आहेत. मात्र, त्यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांमध्ये धर्मांतरणासंदर्भात वेगवेगळे नियम देखील असल्याचं दिसून आलं. भाजपाची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये राज्य स्तरावर धर्मांतर विरोधी कायदा पारीत करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. असाच कायदा महाराष्ट्रात आणावा अशी मागणी नितेश राणेंनी केलीय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *