Headlines

Maharashtra Cabinet: बच्चू कडू यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले “थोडी नाराजी आहेत, आम्ही…” | Maharashtra Cabinet Expansion Independent MLA Bachchu Kadu Meets Chief Minister Eknath Shinde sgy 87

[ad_1]

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यामध्ये अपक्षांना स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणारे बच्चू कडू नाराज असल्याची असतानाच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. नंदनवन बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीनंतर बोलताना बच्चू कडू यांनीदेखील थोडी नाराजी असल्याचं कबूल केलं आहे. पूर्ण मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत वाट पाहू असं ते म्हणाले आहेत.

“नाराजी नाही असं नाही, थोडी नाराजी असतेच. पण ती इतकीही नाही की, आपलं घर सोडून दुसऱ्या पक्षात निघून जाऊ. ही क्षणिक नाराजी आहे. अजून पूर्णपणे मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. पूर्ण विस्तार झाला असता आणि संधी मिळाली नसती तर गोष्ट वेगळी असती,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

अखेर मंत्रिमंडळ विस्तारले ; वादग्रस्त गावित, राठोड, सत्तारांचा समावेश; एकाही महिलेला स्थान नसल्याने सरकारवर टीका

“मी फक्त मंत्रिपदासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिला नव्हता. काही मुद्द्यांच्या आधारे पाठिंबा दिला होता, जर ते मुद्दे विचारात घेतले नाही तर वेगळा विचार करु,” असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. आश्वासन देण्यात आलं होतं, त्यामुळेच आम्ही मागणी करत आहोत, अन्यथा केलीही नसती असंही ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता

“एकनाथ शिंदे यांनी आम्ही तुम्हाला मंत्री करु असं आश्वासन देत शपथ घेतली होती. पहिल्या यादीत नाव नसेल, तर अखेरच्या यादीत तरी असेल,” अशी आशा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. दुसरी यादी अडीच वर्षानंतर येऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे दोन आणि दोन चार नाही तर पाच होतात असंही ते म्हणाले.

शपथ घेतलेले मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा

पुढील विस्तार कधी?

मंत्रिमंडळात महिलांना संधी दिलेली नसल्याने टीका होऊ लागताच पुढील आठवडय़ात आणखी एक छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम निर्णय येत्या शुक्रवारी अपेक्षित असून, केंद्रीय निवडणूक आयोग सप्टेंबरमध्ये निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवरात्रीदरम्यान पुढील विस्तार होईल व दोन मंत्रीपदे रिक्त ठेवली जातील, अशी शक्यता आहे.

खातेवाटप प्रलंबित

मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटप अजून जाहीर झालेले नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात नाराजी आणि धुसफूस आहे. त्यामुळेच खातेवाटपही अद्याप झालेले नाही, असे समजते. पुढील दोन-तीन दिवसांत खातेवाटप जाहीर होईल, असे भाजपा नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *