Headlines

maharashtra breaking news live weather updates political crisis uddhav thackeray eknath shinde pankaja munde sharad pawar shivsena mva bjp latest marathi news

[ad_1]

Maharashtra News Live Updates, 2 october 2022 : शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. ही चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर कुठे आहेत? असाही प्रश्न विचारला गेला. या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकरांनी यांनी एक ट्वीट केलं आहे. “मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.”, असे ते म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो’ नव्हे ‘वंदे मातरम’ या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सरकारी अधिकारी-कर्मचारी यांना सरकारी कार्यालयात त्यांचे सहकारी, कार्यालयात येणारे अभ्यागत यांच्याशी दूरध्वनी अथवा मोबाइल आदींवर किंवा बैठकीत संवाद साधताना ‘हॅलो’ या अंगवळणी पडलेल्या शब्दाऐवजी ‘वंदेमातरम’ असे संबोधन करावे लागणार आहे. ‘वंदेमातरम बोलण्याची सक्ती नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आग्रही आहेत. हा विषयही आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

यासह अन्य सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra Live News Updates, 2 october 2022 : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक बातम्यांचा आढावा, एका क्लिकवर…

दिल्ली येथील ट्विन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती. ती इमारत पडतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच कंपनी मार्फत पुण्यातील चांदणी चौकातील पुलास रविवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट करण्यात आला. मात्र, संपूर्ण पूल पडला नाही. पुलाचा केवळ मध्यभाग पडला आणि दोन्ही बाजूचा भाग तसाच राहिला. त्यामुळे एनएचएआय आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. तसेच या स्फोटाच्या यशस्वीतेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहेत. सोशल मीडियावर मीम्सद्वारे यावर निशाणा साधला जात आहे. १ हजार ३५० डिटोनेटरच्या स्फोटानंतरही चांदणी चौकातील पूल पूर्णपणे का पडला नाही यावर अधिकारी आनंद शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *