Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर! | mumbai news live today 23 september 2022 maharashtra political crisis uddhav thackeray eknath latest marathi news


Maharashtra News Today, 23 September 2022 : महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवार) रात्री उशीरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचेही समोर आले आहे. तर,शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. तर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली आहे.

अशातच मुंबई महानगरपालिकेची मोठी निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आमनेसामने आले आहेत. शिवाय, राज्यात पावसाची देखील शक्यता आहे. एकूणच राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.

Live Updates

राज्यात पावसाची देखील शक्यता आहे. एकूणच राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली.Source link

Leave a Reply