Headlines

माधुरी दीक्षितबद्दल रश्मिका मंदानाचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, ‘तुमच्यामुळे मी आज…’

[ad_1]

Rashmika Madana On Madhuri Dixit: पुष्पा – द राईझ (Pushpa – The rise) या चित्रपटामुळे रश्मिका मंदाना हे नाव खऱ्या अर्थानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. सामे सामे (Saame Saame) या गाण्यामुळे तिला जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या गाण्यावर आजकाल सगळीकडेच रिल्स बनतात. इन्टाग्रामवर (Instagram Reels) तर या गाण्याचे अनेक रिल्स चांगलेच व्हायरल होत असतात. (rashmika madanna says she actress because of madhuri dixit she used to copy her video viral)

रश्मिका मंदाना (Rashmika Madana) या नावाची आज बॉलीवूडमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिचा बॉलीवूड डेब्यू सिनेमा लवकरच प्रदर्शित होतो आहे. रश्मिका मंदाना बिग बी अमिताभ बच्चन (Bollywood Actor Amitabh Bachchan & Rashmika Madana) यांच्यासोबच स्क्रिन शेअर करणार आहे. गुडबाय (Goodbye) हा तिचा पहिला हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो आहे. परंतु सध्या रश्मिकाची वेगळ्याच एका कारणासाठी चर्चा होते आहे, तीही माधूरी दीक्षितमुळे.

आपल्या याच आगामी चित्रपटाच्या निमित्तानं रश्मिका सध्या सगळीकडे आपलं प्रमोशन करताना दिसते आहे. नवरात्रीच्या निमित्तानं रश्मिकानं नुकतीच फाल्गुनी पाठकच्या (Falguni Phatak Garba) गरब्याला हजेरी लावली होती तर आता रश्मिकानं माधुरी दीक्षितच्या रिएलिटी शो झलक दिखल ला जा (Dance Reality Show) मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा रश्मिकानं माधुरी दीक्षितबद्दल केलेल्या विधानामुळं रश्मिका सध्या सगळीकडेच व्हायरल होते आहे. 

रश्मिकाने तिच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील सामी-सामी (Samme Samme Song0 या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स केला आणि माधुरी दीक्षितनंही तिच्यासोबत या गाण्यावर डान्स केला आहे. झलक दिख ला जा (Zhalak Dikh La Ja) या शोचा एक नवा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोत रश्मिका आणि माधूरीची जुगलबंदी पाहायला मिळते आहे. 

रश्मिकानं या शोमधून एक खुलासा केला आहे. तिचं म्हणणं आहे की ती माधुरी दीक्षित यांच्यामुळेच अभिनेत्री झाली. रश्मिका नाच करता करता माधुरी दीक्षितला (Rashmika Dances with Madhuri) म्हणते, आज मी तुमच्यामुळेच अभिनेत्री आहे. रश्मिका याविषयी पुढे बोलते आणि म्हणते की मी तुमची कॉपी करायचे, तुमच्यासारखा डान्स करायचे. याच कारणामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आहे असे मला वाटते.

रश्मिकाने आपल्या बोलण्याने सर्वांची मने जिंकली. प्रोमोमध्ये माधुरी दीक्षित (Madhuri Dixit and Rashmika Mandana) देखील रश्मिका मंदान्नाला मिठी मारताना दिसत आहे. झलक दिखला जा चा (Zhalak Dikh  La Ja Episodes) हा भाग शनिवार आणि रविवारी प्रसारित होणार आहे. मात्र शोचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अधिकच उत्साह पाहायला मिळत आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *