माधूरी दिक्षीतला चेहऱ्याची सर्जरी करणं पडलं महागात; बदलला चेहरा


मुंबई : बॉलिवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षित सध्या ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे. या वीकेंड एपिसोडच्या शूटिंगसाठी माधुरी दीक्षित सेटवर पोहोचली होती. यादरम्यान माधुरी दीक्षितने हिरव्या रंगाचा प्रिंटेड लेहेंगा घातला होता, ज्यावर बॉर्डरवर केशरी रंगाचा अस्तर होता. कानात मोठे मॅचिंग झुमके आणि हातात बांगड्या माधुरी दीक्षितच्या लूकमध्ये भर घालत होती. या डान्स रिअॅलिटी शोचे चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरू आहे.

यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  लक्षात घेण्यासारखं आहे की, माधुरी दीक्षित लिप फिलर आणि बोटॉक्स ट्रिटमेंटमुळे चर्चेत आहे. यूजर्स तिच्या चेहऱ्याबद्दल खूप बोलत आहेत. माधुरी दीक्षित जेव्हा पापाराझींसाठी पोज देत होती तेव्हा यूजर्सनी तिचा स्माईल ‘आर्ट‍िफीशियल’ आणि ‘फेक’ म्हटलं होतं. तर काही लोक तिला विचारत आहेत की, तिने खरंच बोटॉक्स केलं आहे का?

 याशिवाय या दिवसांत अभिनेत्रीचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये माधुरी दिक्षीतच्या चेहऱ्यात खूप बदल झालेला दिसत आहे. ज्यामुळे तिला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

वास्तविक, 5 सप्टेंबर 2022 रोजीही पापाराझींनी माधुरी दीक्षितला ‘झलक दिखला जा 10’ च्या सेटवर पाहिलं. यादरम्यान तिने लाल साडी नेसली होती आणि ऑफ-व्हाइट कलरचा मॅचिंग ब्लाउज घातला होता. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीच्या ओठांच्या आकारात बरेच बदल पाहायला मिळतात. त्यानंतर युजर्सनी तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेबद्दल अंदाज लावला आणि तिला ट्रोल केलं. (What happened to Madhuri Dixi Botox changed the face users were surprised)

अनेक युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करून बोटॉक्स करून घेतलं आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘बोटॉक्सने तिच्या चेहऱ्याचं काय केलं?’ दुसऱ्या युजरने कमेंट केली की, ‘ही सुनंदा पुष्कर की माधुरी?’ आणि एक युजर्स म्हणाला, ‘खूपच बोटॉक्स.’ तर कुणी लिहिलं, ‘भाऊ, चेहऱ्याची अवस्था बिघडली.’Source link

Leave a Reply