Headlines

Madhuri Dixit ने केली ही चूक, त्याची शिक्षा होईल कुटुंबाला!

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच माधुरीच्या ‘माजा मा’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा ही एकदम वेगळी आहे. वडिलांना इंग्रजी बोलता येत नाही. बहिणीही सतत रागात असते. मुलगा 9 ते 5  नोकरी करणारा. आई संपूर्ण कुटुंबाला प्रेमाणे सांभाळते. पण असं काही होतं की संपूर्ण कुटुंबाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. 

कथेबद्दल बोलायचं झालं तर, एक आनंदी-नशीबवान महिला, पल्लवी (माधुरी दीक्षित) च्या जीवनाची झलक मिळते, जी तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ताकद आहे. चित्रपटाची कथा पल्लवीभोवती फिरते. जसजशी कथा पुढे सरकत जाते, तसतसे पल्लवीचा तिच्या मुलासोबत संघर्ष पाहायला मिळतो. हा संघर्ष परस्पर समंजसपणा आणि विश्वासासाठी नातेसंबंधांची चाचणी घेतो. या चाचणीचे कारण काय आहे? पल्लवी आणि तिचं कुटुंबीय या गोंधळाला कसे सामोरे जातील? हे कुटुंबातील सदस्यांना जवळ आणेल की नवीन नातेसंबंध तोडेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं 6 ऑक्टोबरला मिळणार आहेत.

आणखी वाचा : Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

माधुरी दीक्षितने या चित्रपटाविषयी सांगितले की, ‘मी प्राइम व्हिडिओच्या पहिल्या इंडियन अॅमेझॉन ओरिजिनल चित्रपटाचा भाग बनण्यास उत्सुक आहे. ‘माजा मा’ मध्‍ये मी सर्वात उत्‍सुक आहे ते माझं पात्र. ही स्वतःमध्ये बारकावे असलेली एक गुंतागुतीची भूमिका आहे. मी याआधी अशी भूमिका कधीच साकारली नव्हती. एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून आणि समाजासाठी योगदान देणारी म्हणून पल्लवी पटेल एक मोठी जबाबदारी इतक्या सहजतेने पार पाडते की तिची ताकद, आत्मविश्वास आणि पुन्हा उभे राहण्याची क्षमता दुर्लक्षित करणं सोपं आहे. ती विविध भावनांमधून जाते ज्याचा तिच्या जीवनावर आणि तिच्या प्रियजनांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. (Madhuri Dixit Maja Ma Trailer Release Gajraj Rao Ritwik Bhowmik Barkha Singh Srishti Shrivastava Amazon Prime Video Original Movie) 

आणखी वाचा : ‘मराठी रॅप सुनने गुज्जू भी …’, तरुणीचा मराठमोळा रॅप सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; एकदा तुम्हीही ऐकाच

या चित्रपटाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना गजराज राव म्हणाले, ‘माजा मा’ या चित्रपटात तुम्ही मला एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या, वडिलांची आणि प्रेमळ पत्नीच्या पतीची भूमिका साकारताना पाहाल. आपण चित्रपटात पहाल त्याप्रमाणे, पात्राला जीवनात काही मनोरंजक, कधीकधी आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जावे लागते ज्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. माधुरी दीक्षित, सर्व कलाकार सदस्य आणि निर्मात्यांच्या संपूर्ण टीमसोबत काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. प्राइम व्हिडिओवर 240 देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार असल्याने, मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहे.

आणखी वाचा : Birthday Kareena Kapoor Khan चा पण चर्चा मात्र मलायकाची, पाहा काय म्हणाले नेटकरी

या चित्रपटात गजराज राव, ऋत्विक भौमिक, बरखा सिंग, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, सिमोन सिंग, शीबा चढ्ढा, मल्हार ठकार आणि निनाद कामत यांसारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे, तर सुमित बठेजा यांनी ही कथा लिहिली आहे. लिओ मीडिया कलेक्टिव्ह आणि अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *