मधुबालापेक्षा सुंदर ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, पाकिस्तानात होती अफेअरची चर्चा


Entertainment News : मधुबाला (Madhubala) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला (Indian Film Industry) पडलेलं एक सुंदर स्वप्न. आजवरच्या बॉलीवूड (Bollywood) इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून मधुबालाची ओळख आहे. 

मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत असा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याची 62 वर्षांनंतरही लोक प्रशंसा केल्याशिवाय राहू शकत नाहीत. या चित्रपटात दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर आणि दुर्गा खोटे या कलाकरांचा सहभाग होता. या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री होती, जिचं नाव होतं निगार सुलताना. त्यावेळी सुलताना सुंदरतेवर सर्वच जण भाळले होते.

लोकांनी तर मधुबालापेक्षाही निगार सुलताना सुंदर असल्याचं म्हटलं होतं. तिच्या सौंदर्याने ‘मुघल-ए-आझम’चे दिग्दर्शक आणि निर्माते के. आसिफ यांनाही भुरळ घातली होती आणि दोघांनी लग्नही केलं होतं, पण असं असलं तरी त्यावेळी निगार सुलताानाचं नाव पाकिस्तानी अभिनेता दर्पण कुमारसोबत जोडलं गेलं होतं. यानंतर, 1959 मध्ये, निगारला पाकिस्तानी अभिनेत्याशी लग्न झाल्याची अफवा खोडून काढण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागली.    

निगारचा जन्म 21 जून 1932 रोजी हैदराबादमध्ये झाला. निगार सुल्ताना यांचे वडील हैदराबादच्या निजामच्या सेनेचे मेजर होते. निगार सुल्ताना यांच्या वडीलांचे मित्र जगदीश शेट्टी हे मोहन भवनानी यांच्या बरोबर एक चित्रपट बनवत होते त्यात निगार सुल्ताना यांना हिरोइन म्हणून निवडले. निगारने 1946 मध्ये ‘रंगभूमी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

राज कपूरचा ‘आग’ हा त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा ब्रेक होता. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर तिने राजकुमार सलीम (दिलीप कुमार) आणि अनारकली (मधुबाला) यांच्या प्रेमाचा तिरस्कार करणाऱ्या ‘मुघल-ए-आझम’मध्ये दरबारी नृत्यांगना बहारची भूमिका केली. 

‘तेरी मेहफिल में’ आणि ‘जब रात हो ऐसी मतवाली’ ही त्यांची गाणी त्यांच्यावर चित्रित झाली. ती ‘पतंगा’, ‘दिल की बस्ती’, ‘शीश महल’, ‘खेल’ आणि ‘मिर्झा गालिब’सह अनेक चित्रपटांमध्ये दिसली. 50 च्या दशकात ती खूप सक्रिय राहिली. 1986 मध्ये प्रदर्शित झालेला जंबिश हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट होता.

निगारचे लग्न आसिफसोबत झाले, त्याआधी तिचं आणखी एक लग्न झालं होतें. पण अपत्य नसल्यामुळे आणि देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेल्यामुळे दोघांचा घटस्फोट झाला. पुढे आसिफ आणि निगार यांना हिना कौसर नावाची मुलगी झाली. यानंतर आसिफने अख्तरसोबत लग्न केलं, जी अभिनेता दिलीप कुमार यांची बहीण होती. 

या नात्यावर दिलीप कुमार नाराज असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आसिफ आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, जो कधीच भरून निघाला नाही. Source link

Leave a Reply