Lust Stories 2 : चाहत्यांची उत्सुकता संपली! Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा ‘लस्ट स्टोरीच 2’ लवकरच होणार प्रदर्शित


Lust Story 2 : ‘लस्ट स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांना ‘लस्ट स्टोरी 2’ (Lust Stories 2) ची प्रतिक्षा होती. दरम्यान, 14 फेब्रुवारी २०२२ ला व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) मुहूर्तावर ‘लस्ट स्टोरी 2’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल (Kajol) , अंगद बेदी (Angad Bedi), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia)आणि तिलोत्तमा सोम (Tilottama Som) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन सुजॉय घोष, आर बाल्की, कोंकणा सेन शर्मा आणि अमित रवींद्रनाथ शर्मा करत आहेत. विशेष म्हणजे अनुराग कश्यप, झोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि करण जोहर यांच्या ‘लस्ट स्टोरी’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. आता त्याचा दुसरा भाग येणार आहे. 

रिपोर्ट्सनुसार, शोचे निर्माते 2023 च्या व्हॅलेंटाईन डे ला ही सीरिज प्रदर्शित करणार आहे. हा शो नातेसंबंधांचे अनेक पैलू दाखवणार आहेत. त्यामुळे सीरिज प्रदर्शित होण्यासाठी हीच वेळ सर्वोत्तम असल्याचे त्यांना वाटते. या सीरिजशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ही शुक्रवारी प्रदर्शित होऊ शकते आणि लवकरच त्याची घोषणा केली जाईल. 

हेही वाचा : Ajay Devgn आणि Tabu ची एकूण संपत्ती तुम्हाला माहितीये का? आकडा ऐकून बसेल धक्का

ही सीरिज सध्या पोस्ट प्रोडक्शनच्या टप्प्यावर आहे. सुजॉय घोषच्या ‘लस्ट स्टोरी’मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दिसणार आहेत. तर आर बाल्की यांच्या कथेत मृणाल ठाकूर, अंगद बेदी आणि नीना गुप्ता आहेत. काजोल अमित रवींद्रनाथ शर्मा यांच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. कोंकणा सेन शर्माच्या कथेत तिलोत्तमा सोम आणि अमृता सुभाष दिसणार आहेत. (kajol angad bedi tamannaah bhatia and tilottama som lust stories 2 release date) 

विशेष म्हणजे, ‘लस्ट स्टोरी’ नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यात अनेक कलाकारांचा मोलाचा वाटा होता. त्याच वेळी, करण जोहर (Karan Johar) दिग्दर्शित आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनीत ‘लस्ट स्टोरी’ला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर शोमधील काही सीन वरून सोशल मीडियावर बराच वाद सुरु होता. लस्ट स्टोरीमध्ये चार वेगवेगळ्या कथांचा समावेश आहे ज्या शो दरम्यान उलगडतात.Source link

Leave a Reply