प्रेम, ब्रेकअप आणि आता हे…. प्रसिद्ध अभिनेत्रीनं का घेतला Eggs Freezing करण्याचा निर्णय?


मुंबई : वयाच्या अमुक एक टप्प्यावर आल्यानंतर मी हे करणार, ते करणार, माझं हेच स्वप्न आणि तेच… अशा अनेक अपेक्षा आपण उराशी बाळगत असतो. मात्र या अपेक्षा पूर्ण करत असताना काही गोष्टींचा विसर पडतो आणि जाणीव होते तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. 

एका लोकप्रिय अभिनेत्रीला अशीच जाणीव झाली आणि आपल्याला उशिरक होतोय का, असं वाटत असतानाच तिला सुवर्णमध्य सापडला. वयाच्या 33 व्या वर्षी या अभिनेत्रीच्या मनात Eggs Freezing चा विचार आला आणि 39 व्या वर्षी तिनं तो अंमलात आणला. साधारण वर्षभरापूर्वी तिनं हे पाऊल उचललं.

ही अभिनेत्री म्हणजे काजोलची बहिणी, तनिषा मुखर्जी. Bigg Boss 7, Khatrona Ke Khiladi 7 या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या तनिषानं हा निर्णय घेतला होता. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिचं वजनही वाढलं. रिअॅलिटी शोमध्ये अरमान कोहली याच्यासोबतचं प्रेम, त्यानंतर ब्रेकअप आणि पुढे हे वळण अशा परिस्थितीतून तनिषा पुढे आली. 

तिचा हा निर्णय नजरा वळवणारा होता. महिलांमध्ये असणाऱ्या प्रजनन क्षमतेसाठी एग्ज फ्रिजिंग हा एक पर्याय अतिशय मदतीचा ठरत आहे. याच प्रक्रियेला तनिषा सामोरी गेली. एग्ज फ्रिज करण्याच्या निर्णयानंतर ती प्रचंड आनंदात होती. पण, त्यानंतर मात्र तिनं आरोग्याची काळजी घेत सुदृढ जीवनशैली आपलीशी केली. 

वयाच्या 33 व्या वर्षी जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला डॉक्टरांनी असं करण्यापासून थांबवलं होतं. जेव्हा आई होण्याची कोणतीही आशा नसेल तेव्हाच हा निर्णय घेण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला. 

Tanishaa Mukerji opens up on constant comparisons with sister Kajol

हा निर्णय म्हणजे सर्वस्वी वैयक्तिक निर्णय असल्याचं तनिषानं सांगितलं. मुलं न होऊ न देण्याचा निर्णय घेणं या वावगं काहीच नाही, दत्तक करा पुरेशी मुलं आहेत या जगात. लोकांनी या विषयावर पुढे येऊन खुलेपणानं बोलण्याची गरज असल्याचं म्हणत महिलांनी मलं न होऊ देण्याचा निर्णय गैर नसल्याची बाब तिनं अधोरेखित केली. 

लग्न न करणं, कोणत्याही नात्यात न गुंतणं, सोबत कोणही पुरुष नसणं हे अतिसामान्य असल्याचं म्हणत तिनं वेगळा दृष्टीकोन एका मुलाखतीदरम्यान मांडला होता. Source link

Leave a Reply