Lord Sun: तुम्हाला माहितेय का? रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्यास होतात आश्चर्यकारक फायदे


Lord Sun: रविवारी  सूर्यदेवाची (Lord Sun) पूजा केली जाते. हिंदू धर्मात (Hindu religion) रविवारी सूर्यपूजेचा नियम आहे. असे मानले जाते की सूर्यदेवाची उपासना केल्याने आणि त्यांच्या मंत्रांचा जप केल्याने मनुष्याला सौभाग्य प्राप्त होते परंतु आरतीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. आज आम्ही तुम्हाला केवळ सूर्य आरतीच शिकवणार नाही तर सूर्यदेवाच्या आरतीचे अनेक आश्चर्यकारक फायदेही सांगणार आहोत. (Lord Sun Do you know Worshiping Lord Surya on Sunday brings amazing benefits nz)

सूर्यदेव आरती 1 (Surya Dev Aarti 1)

जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या ।
एकारति ओवाळु सुरगण – प्रभुवर्या ॥धृ॥
द्वादश नामें करुनि करितां तव प्रणती ।
दोष निवारुनि इच्छित मनोरथ पुरती ।
अर्ध्यप्रदान करितां पुण्याची प्राप्ती ।
दर्शनमात्रें साधक भवसागर तरती ॥१॥
ब्राह्मणकुळासि दैवत तुजवांचुनि नाहीं ।
त्रिकाळ अर्घ्य देती द्विजवर लवलाहीं ॥
प्रथम अहूति अर्पण यज्ञाचे ठायीं ।
सर्व जगाचि दृष्टी तुजयोगें पाहीं ॥२॥
दशयोजन मोठा रथ निजसारथि अरुण ॥
सप्तमुखाचा अश्व शोभतसे वहन ।
अठ्यायशीसहस्त्र ऋषि करिति स्तवन ।
निरंजन प्रार्थितसे करुनिया नमन ॥३॥

सूर्यदेव आरती 2 (Surya Dev Aarti 2)

जयदेव जयदेव जय भास्कर सूर्या विधिहरि शंकररूपा जय सुरवरवर्या ||धृ ||

जय जय जगतमहरणा  दिनकर सुखकिरणा | उड्याचल भासक दिनमणी शुभस्मरणा |

पद्मासन सूर्यमूर्ती सुहास्य वरवंदना | पद्माकर वरदप्रभ भास्तव सुखसदना ||१||

कनका कृतिरथ एक चक्राकित तरणी | सप्तानना श्र्वभूषित   रथीं त्या बैसोनि |

योजनासहस्त्र  द्वे द्वे शतयोजन दोनीं | निमिषार्धे जग क्रमीसी अद्भुत तव करणी ||२||

जगदुद्व स्थिती प्रलयकरणाद्यरूपा | ब्रम्ह परात्पर पूर्ण तूं  अद्वं तद्रूपा |

ततवंपदव्यतिरिक्ता अखंडसुखरूपा | अनन्य तव पद मौनी वंदित चिद्रूपा || ३ || जयदेव ..

आणखी वाचा – Astro Tips : चपाती करताना चुकूनही करु नका या गोष्टी, नाही तर अन्नपूर्णासोबतच महालक्ष्मी होईल नाराज

सूर्यदेवाची पूजा केल्याने फायदा होतो (Benefits Of Surya Aarti)

1. केवळ रविवारी नव्हे तर दररोज सूर्यदेवाची आरती केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
2. सूर्यदेवाच्या आरतीच्या प्रभावाने माणसाला कुष्ठरोगापासून मुक्ती मिळते.
3. सूर्यदेवाची आरती केल्याने समाजात मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.
4. सूर्यदेवाची आरती केल्याने केवळ सूर्य देवाचीच नव्हे तर नऊ ग्रहांची कृपा प्राप्त होते.
5. सूर्यदेवाची उपासना केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते आणि शरीर निरोगी होते.
6. सूर्यदेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)Source link

Leave a Reply