लॉकडाउन – सुख ,समाधान आणि निरपेक्ष प्रेम शिकवणारा काळ

 


                                   पाखरांची किलबिलाट, चिमण्यांची चिवचिवाट ऐकून जिथे दिवसाची सुरुवात होत असे. आज तिथे रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने जाग येत आहे.रात्री अपरात्री जेव्हा केव्हा हे आवाज कानावर पडले मनात भीतीचं काहूर माजत . कुठे, कुणाला काही झालं तरी नसेल ना या विचाराने मन भयभीत होऊन जातं होतं. पांढरे निळे पीपीई किट घालून आलेले . ज्यांचे ना डोळे दिसायचे ना चेहेरे असे काही लोक यायचे आणि घरातील व्यक्तींना घेऊन जायचे. काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण असायचा. कोरोना हा संसर्गजन्य आजार पाहता पाहता आपल्या घरा दारा पर्यंत येउन ठेपलाय याची तीव्र जाणीव होऊ लागली. दिवस रात्र रेडिओ, टीव्ही वरून प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या पाहुन मन अधिकच खचायचं.या अशा भयावह वातावरणात सकारात्मक राहणं जणू एक चॅलेंज होतं. पण या सोबतच अश्या ही काही घटना होत्या ; ज्या जगण्याचं बळ देवून जात. कोरोना ने माणसाला माणसापासून जरी दूर केलं असलं तरी , माणुसकी पासून दूर लोटू शकला नाही. या काळात या ना त्या प्रकारे लोकांना गरजूंची,गरिबांची मदत करताना पाहिलंय. देवरूपी माणूसचं ती. अशा बिकट काळातही मदतीचे हात कमी नाही झाले. याची मनोमन धन्यता वाटते.

                                  फ्रंट लाईन वर्कर्स ते डॉक्टर, जीवनावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी ते या काळात होईल व जमेल ती मदत करणारी लोकं ही जणू देवांचीच साक्षात रूपं होती.जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जागृती निर्माण करून कोरोना टेस्ट करणारे कर्मचारी असो किंवा काळाचा घाव पडल्याने कोरोना मुळे दगावलेल्या लोकांची दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे सारसावलेले हात.  जीवाची भिती बाजूला सारून त्यांनी माणुसकी जपली.का तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. हे कर्तव्य जसे त्यांचे तसे आपलेही आहे .आपणही समाजाचे देणे लागतोच. आपापल्या परीने जे शक्य ते करावे याच हेतूने  सगळे झटले. होईल ती मदत केली. ही या दुर्दैवी काळातील सुदैवी बाजू म्हणावी लागेल.

                               आणखी सांगायचं झालाच तर,कधी न्हवे ते इतका वेळ आपण एकत्र आपल्या परिवारासोबत घालवत आहोत. या काळात नक्कीच आपण आपल्या आप्त लोकांना समजू लागलो आहोत जाणू लागलो आहोत, एकमेकांची आवड निवड कळू लागली आहे.एका छता खाली कित्येक वर्ष एकत्र राहूनही जे मन जुळले नाहीत ते आता जुळत आहेत.आई बाबा भाऊ बहीण या सोबत वेळ घालवून आपण जणू एकमेकांना भावनिक समाधान भावनिक आसरा देत आहोत. प्रत्येक गोष्ट,घडणारी घटना ही आपल्या सोबत एक वाईट तर एक चांगली बाजू नक्कीच घेऊन येते.याची प्रचिती या टाळेबंदीत येत राहिली.

                                 


   


           या काळात स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहेच कारण कोरोना वर कोणतंही एक  अस रामबाण औषध आणखी आलेलं नाही. ज्या लसी,औषधं आलेली आहेत त्या फक्त आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहेत. जे आपल्याला कोरोना विरुद्ध युद्ध लढण्यास ताकदीने मदत करतील. त्यामुळे काळजी घेणं हेच यावरच महत्वाचं आणि मारक उपाय आहे.

                      म्हणूनच या काळात जनजागृती करण मला महत्वाचं वाटलं आणी मी ते आपल्या स्तरावर करत आहे. लसीकरणा बद्दल , कोरोना बद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफ़वा या दूर करण, समाज प्रबोधन करण हे आपलं ही कर्तव्य आहे असं समजून जर आपण काम केलं तर हा वाईट  कालावधी ही आपण तरुण जाऊ शकू.कमीतकमी नुकसान सोसून आपण यातून नक्कीच बाहेर येऊ. आणि पुन्हा एकदा या खुल्या आसमंता खाली मोकळा श्वास घेऊ शकू.


                          हा काळ व हा मिळणारा वेळ आपण सत्कारणी लावू शकतो, ही वेळ खरी आत्मपरिक्षणाची आहे.कोरोना सारख्या अति सूक्ष्म पण  महाकाय अश्या विषाणू ला हरवण्यासाठी औषधां सोबतच गरज आहे ती सकारात्मकतेच्या ताकदीची.जर ती मिळाली तर हे अदृश्य अस युद्ध आपण जिंकू शकू यात तिळमात्र शंका नाही. कारण घाबरून जाऊन हतबल होऊन जीव सोडताना या काळात खूप जणांना पाहिलं. यातून इतकंच कळलं की लढण्या साठी मनाचं निरोगी राहणं खुप महत्वाचं आहे. या निरोगी मन निर्मिती साठी स्वतःशी सवांद साधा स्वतःशी बोला. ह्या मिळालेल्या वेळेचा सदुयोग करा. मी सुद्धा या वेळेत जे कधी जमलं नाही वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे.ते सर्व करण्याचां पर्यन्त केला. बझील चे प्रख्यात लेखक कोहेलो पाओलो ह्याच जगभर गाजलेलं “द अलकेमिस्ट” हे पुस्तक वाचून काढलं.अशी अनेक पुस्तकं घरी असून ही मला वाचता आलेली न्हवती.ती सर्व वाचून काढली. गाणी कविता लिहायची सवय तर होतीच पण यावेळी मी ती लिहिली ही आणि स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ही पाहिली व ऐकली. हा अनुभव छान होता वेगळा होता.एकदा असच कपाट आवरत असताना लक्षात आलं की खूप काही असे कपडे आहेत जे कित्येक वर्षांपासून वापरात आलेले नाहीत.ते कपडे घेतले व गरजू ना ते दिले.कोरोना काळात असे कोणते ही काम करा ज्याने मन शांत व प्रसन्न होईल.अशी अनेक काम या गेल्या दीड वर्षात केली.निस्वार्थ भावनेने केलेलं कोणतही काम मनाला समाधान नक्कीच देत.व त्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आलेलं ते स्मित हास्य म्हणजे एक औषध च ठरतं आपल्या आंतर मनातील जखमेसाठी. जेव्हा आपण दुसऱ्याला काही तरी देतो, कुणासाठी तरी काजी मनापासून परताव्याची अपेक्षा न करता काही तरी करतो तेव्हा आपल्या ला ही काही न काही नक्कीच मिळत असतं.

अदृश्य अस, सुख, समाधान  आणि निरपेक्ष प्रेम.

हेच या कोरोना काळान शिकवलं.

                                                                              लेखन  – शहजोया , पत्रकारितेची विद्यार्थिनी   

Leave a Reply