Headlines

रस्त्यावर वाहने अडवून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

पंढरपूर – दि. ०५/११/२०२१ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार गोपीचंद दादा गवळी व त्यांची पत्नी हे दुचाकी वरून पंढरपूर ते सोलापूर ति-हे मार्गे जाणाऱ्या रस्त्याने अंकोली ता. मोहोळ येथे जात असताना रात्री ८ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात आरोपी यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचेकडील सोन्याचे दागिने व मोबाईल फोन जबरी चोरी करून नेला म्हणुन अज्ञात आरोपी यांचे विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं ७७० / २०२१ भादंवि क. ३९४, ३४ अन्वये दिनांक ०६/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्हा रस्त्यावरील जबरी चोरीचा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सर्जेराव पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक धंनजय पोरे व पोलीस उप निरीक्षक अमितसिद पाटील यांचे पथकास मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस – आणणेबाबत सुचना केल्या होत्या.

या पथकाने गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवुन गुन्हयाचा संमातर तपास सुरू केला. या तपासात तांत्रिक माहिती व गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हया तारापुर ता. पंढरपूर येथील आरोपीनी केल्याचे समजुन आले. दिनांक १०/१०/२०२१ रोजी सदरचे तपास पथकांनी नमुद आरोपींचा तारापुर ता. पंढरपूर भागात शोध घेत असताना, एकुण चार आरोपी तपास पथकांने ताब्यात घेतले. सदर आरोपीतांकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली . वरील आरोपीत यांना या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे.

आरोपीत यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल, गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोटार सायकल व सोन्याचे मणी असा रूपये १,०५,०००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धंनजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक, अमितसिद पाटील, सफौ. शिवाजी घोळवे, पोलीस ” अंमलदार प्रकाश कारटकर, सलीम बागवान, सचिन गायकवाड, सचिन मागाडे चापोना/ केशव पवार सर्व नेमणुक स्था. गु. शाखा, अंमलदार शरद कदम, शोएब पठाण ने. पंढरपूर शहर पो. ठाणे यांनी बजावली आहे.

Leave a Reply