Headlines

पत्र, सही, मोबाईल अन् गाडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात “जिथे जातो तिथे मंत्रालय” | eknath shinde comment on working method said working in car

[ad_1]

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन साधारण दोन आठवडे उलटले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाला किती मंत्रीपदं मिळणार आणि भाजपाच्या वाट्याला कोणती खाती येणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र अद्याप शिंदे सरकाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. हा मुद्दा घेऊन मंत्रीमंडळ विस्तार न झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर कठोर टीका केली जात आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारचे काम कसे चालते, याची माहिती एका जाहीर सभेत दिली आहे. मी जिथे असतो, तिथेच मंत्रालय सुरु होते. गाडीत, मोबाईलवर माझे काम सुरुच असते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> मविआ सरकारची शेवटची मंत्रीमंडळ बैठक बेकायदेशीर, औरंगाबादच्या नामकरणावर उद्या निर्णय- एकनाथ शिंदे

“काही लोक म्हणतात की अजून मंत्रालय सुरु केलं नाही. मी जिथे जातो तिथे माझे काम सुरु असते. मोबाईलवर, गाडीमध्ये काम सुरु आहे. माझ्याकडे पत्र घेऊन येतात, मी सही करतो. लगेच ते पत्र समोर पाठवले जाते. नंतर लगेच काम सुरु होते. मी मुख्यमंत्री आहे. मी लिहलेला शब्द अधिकाऱ्यांना आदेश म्हणून पाळावा लागतो,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Chandrakant Patil : मंत्रीमडळ विस्तार कधी होणार? चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं, म्हणाले…

तसेच, पुढे बोलताना शिंदे गट-भाजपा सरकार सर्वसामान्यांना आपले वाटले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “आम्ही पेट्रोलचा दर ५ रुपये तर डिझेलचा दर ३ रुपयांनी कमी केला. जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते, त्यांना ५० हजार रुपये इन्सेंटिव्ह दिले. सर्वसामान्य माणसांसाठी आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू. हे गरिबांचे सरकार आहे. सर्व समाजाचे सरकार आहे. सर्वांना हे सरकार माझे आहे, हा मुख्यमंत्री आमचा आहे, असे वाटले पाहिजे,” अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *