Headlines

Barshi -विद्यार्थ्यांनी गिरविले कायद्याचे धडे

बार्शी/प्रतींनिधी – राजर्षी शाहू विधी महाविद्यालय व तालुका विधी समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने बार्शी टेक्निकल हायस्कूल मध्ये शुक्रवारी कायदेविषयक जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये बाल अधिकार, मुलभूत हक्क व कर्तव्ये, महिलांच्या सुरक्षेसाठी सुविधा व हक्क या विषयावर राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी केदार पाटील ,स्नेहा निंबाळकर ,कांचन क्षीरसागर ,राहुल मिरगणे ,विजय काकडे ,कर्णराज जाधव यांनी इयत्ता 9 वी व 10 वीच्या विध्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी टेक्निकल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विक्रम टकले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमाले मॅडम , तर आभार श्री बारकूल यांनी मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *