Headlines

लतादीदींनी जेव्हा आशाताईंसाठी आभाळएवढं मन, अबोला तुटला आणि गाण्यातही सूर असे जुळले

[ad_1]

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यातील अबोला तर सर्वांनाच ठाऊक आहे. या अबोल्यामागची गोष्ट आणि काही खास आठवणी आजही न विसरण्यासारख्या आहे. सख्खी बहीण आणि तिच्या वागण्यामुळे पोहोचलेली ठेच यातून दुखावलेल्या लतादीदी. आशा भोसले यांनी आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवलं खरं पण नंतर दोन्ही बहिणींमध्ये अबोला आला. 

वडिलांचं छत्र अचानक डोक्यावरून गेल्यानं लतादीदींवर घरची सगळी जबाबदारी आली. दोघींच्या शिक्षणासाठी पैसे भरण्याएवढी त्यावेळी आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे आशा भोसले यांना शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लतादीदींच्या पावलावर आशा भोसले यांनी पाऊल ठेवलं. त्याही संगीत क्षेत्रात वळल्या. 

यामुळे आला होता लतादीदी-आशा भोसले यांच्यात अबोला

लतादीदी आणि आशा भोसले या दोघी बहिणींनी कधीच एकमेकांमध्ये स्पर्धा केली नाही. स्पर्धेमुळे नाही तर आशा भोसले यांच्या एक निर्णयामुळे लतादीदींसोबत अबोला आला होता. लतादीदींना याबाबत स्वत: एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. या मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार आशा भोसले यांनी न सांगता त्यावेळी लग्न केलं होतं. जे अजिबात लतादीदींना आवडलं नव्हतं. 

आशा भोसले यांच्या निर्णयानं आईला मोठा धक्का बसला होता. आम्ही तिला काहीच त्यावेळी बोललो नाही. मात्र गणपतराव भोसले म्हणजे आशाचे पती यांनी आमच्याशी बोलण्यासही बंदी घातली होती. त्यांनी आशा भोसले यांना अनेक बड्या संगीतकारांकडे नेलं. गणपतरावांना वाटलं आशा मोठी रक्कम मागतील मात्र तसं काहीच झालं नाही. 

बरेच वर्ष ही परिस्थिती राहिली. आशा यांनी काही वर्ष ह्या सगळ्या गोष्टी सहन केला. त्यानंतर त्या पतीला सोडून आल्या. त्यावेळी पेडर रोडला आम्ही राहात होतो. ‘आशा जेव्हा माहेरी आली तेव्हा ती गर्भवती होती. त्यावेळी पेडर रोडला आमच्या शेजारी आशाला दुसरा प्लॅट घेऊन दिला.’ असं लतादीदी मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या. 

आशा भोसले आणि लतादीदी यांच्यातील हा अबोला त्या सगळ्या घटनेनंतर हळूहळू कमी झाला. 1963 मध्ये ‘मेरे महबूब में क्या नहीं’  या गाण्यामध्ये दोन्ही बहिणींचा आवाज संपूर्ण जगाला ऐकायला मिळाला होता. 1984 मध्ये ‘मन क्यूं बहेका रे बहका’ हे गाणं त्यांनी गायलं. 

दीदींच्या चष्म्यातून अशी मिळाली दाद

आशा भोसले यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की लतादीदींसोबत गाणं म्हणजे खूप तयारी करून गाण्यासारखं होतं. त्या जर 100 टक्के देत असतील तर आपण 99 टक्के द्यायला हवं असं मला वाटायचं.  

‘मन क्यूं बहेका’ गाण्याचं जेव्हा रेकॉर्डींग सुरू झालं तेव्हा, दीदी आधी पहिली ओळ गायल्या. त्यानंतर मी पुढची ओळ गायले. त्यानंतर दीदीने चष्मा उतरून मला दाद दिली त्यावेळी जोरात टाळ्याही वाजल्या होत्या. हे आमचं शेवटचं एकत्र गायलेलं गाणं होतं. मात्र ते माझ्यासाठी खूप जास्त खास होतं. असं यावेळी बोलताना आशा भोसले म्हणाल्या होत्या. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *