Headlines

Laptop Tips: लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ शॉर्टकट Keys येतील कामी; मिनिटात पूर्ण होईल कोणतेही काम

[ad_1]

नवी दिल्ली :Laptop Shortcut Keys:स्मार्टफोनप्रमाणेच सध्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटर देखील महत्त्वाचा झाला आहे. करोना व्हायरस महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाउननंतर मोठ्या प्रमाणात लॅपटॉपचा वापर वाढला आहे. ऑफिसचे काम असो अथवा कॉलेजचा प्रोजेक्ट, लॅपटॉप तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही देखील दररोज लॅपटॉपचा वापर करत असाल तर तुम्हाला महत्त्वाच्या शॉर्टकट Keys माहिती असणे गरजेचे आहे. या शॉर्टकट Keys च्या मदतीने तुमचे काम खूपच लवकर पूर्ण होईल. महत्त्वाच्या शॉर्टकट Keys माहित असल्यास वेळेची देखील बचत होते. तुम्ही जर कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपचा वापर करत असाल तर या शॉर्टकट Keys चा नक्कीच वापर करू शकता. या महत्त्वाच्या शॉर्टकट Keys बाबत जाणून घेऊया.

Window + alt + R

Window + alt + R या शॉर्टकट की बाबत कदाचितच तुम्हाला माहिती असेल. या शॉर्टकट की ला एकाच वेळी प्रेस केल्यानंतर लॅपटॉपचे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होते. स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला Window + Alt + R बटन एकाचवेळी दाबावे लागेल. तुम्हाला जर लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करायची असल्यास, या शॉर्टकट Keys चा वापर करू शकता.

Window + L

तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करत असाल व लॅपटॉपला बंद न करता बाहेर जायचे आहे अथवा जेवण करायचे असल्यास या शॉर्टकट की चा वापर करू शकता. Window + L या शॉर्टकट key चा वापर केल्यास तुमचा लॅपटॉप लॉक होईल.

Alt + Print

तुम्हाला जर पीसी अथवा लॅपटॉपवर स्क्रीन शॉट काढायचा असल्यास याचा खूपच उपयोग होईल. Alt + Print शॉर्टकट Key एकाचवेळी दाबून तुम्ही स्क्रीन शॉट काढू शकता.

Window + M

तुमच्या लॅपटॉपवर एकाचवेळी अनेक विंडो ओपन आहेत व तुम्हाला मिनीमाइज करायचे असल्यास Window + M शॉर्टकट Key चा वापर करा. या शॉर्टकट Key चा वापर केल्यानंतर जेवढ्या विंडो ओपन आहेत, त्या सर्व मिनीमाइज होतील. दरम्यान, तुम्ही जर ऑफिस व कॉलेजच्या कामासाठी नियमित लॅपटॉपचा वापर करत असाल तर या शॉर्टकट Key चा उपयोग होईल. यामुळे वेळेची देखील बचत होईल.

वाचा: Elon Musk Tweet: Elon Musk यांचे स्वतःच्या मृत्यूबाबत धक्कादायक ट्विट, म्हणाले…

वाचा: Smartphone Offers: ३,५०० रुपये स्वस्तात मिळतोय Samsung चा शानदार ५जी फोन, ५०MP कॅमेरा-५०००mAh बॅटरीसारखे दमदार फीचर्स

वाचा: Amazon Sale: बंपर ऑफर! तब्बल ५०% डिस्काउंटसह मिळतायत ‘हे’ शानदार एसी, सेलचा उद्या शेवटचा दिवस

वाचा: Long Validity Plans: एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभराचे टेन्शन विसरा, रोज २ GB डेटा, Free कॉलसह Disney+ Hotstar चा आनंद घ्या

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *