लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ Shortcut Keys चा होईल उपयोग; जाणून घ्या डिटेल्स


नवी दिल्ली: स्मार्टफोन असो अथवा लॅपटॉप… कोणत्याही डिव्हाइसवर काम करताना काही शॉर्टकट्स माहिती असणे गरजेचे आहे. शॉर्टकट्स माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. ऑफिसपासून ते कॉलेजच्या प्रोजक्ट्साठी आता लॅपटॉप देखील खूपच कामाचे डिव्हाइस झाले आहे. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना काही Shortcut Keys माहिती असणे गरजेचे आहे. या शॉर्टकट कीजचा वापर करून तुम्ही सहज काम पूर्ण करू शकतात. ऑफिसमध्ये जर लवकर काम संपायचे असल्यास हे शॉर्टकट कीज तुम्हाला खूपच उपयोगी येतील. या Shortcut Keys विषयी जाणून घेऊया.

वाचा: स्नॅपड्रॅगन ८८८ सह Asus 8z भारतात लाँच, फीचर्स लय भारी, फोन OnePlus 9RT आणि iQOO 9 ला देणार टक्कर

Alt + F4 आणि Ctrl+Insert

अनेकदा लोक कॉम्प्युटरला बंद करण्यासाठी विंडोवर टॅप करून शटडाउनचा पर्याय निवडतात. यामुळे कॉम्प्युटर बंद करण्यासाठी खूप वेळ जातो व मोठी प्रोसेस देकील आहे. परंतु, तुम्ही केवळ Alt + F4 शॉर्टकट की चा वापर करून थेट कॉम्प्युटर बंद करू शकता. तसेच, Ctrl+Insert ही देखील खूप कामाची शॉर्टकट की आहे. आपण सर्वसाधारणपणे टेक्स्ट कॉपी करण्यासाठी Ctrl+C चा वापर करतो. परंतु, तुम्ही Ctrl+Insert वापरून देखील कोणताही शब्द सहज कॉपी करू शकता. कीबोर्डवरील एखादे बटन चालत नसल्यास हा पर्याय खूपच उपयोगी येईल.

Window + D आणि Window + Shift + S

Window + D या शॉर्टकट की चा उपयोग करून तुम्ही थेट डेस्कटॉपवर पोहचू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही टॅबला मिनीसाइज करण्याची गरज पडणार नाही. तसेच, स्मार्टफोनवर स्क्रीनशॉट काढणे आता नियमित झाले आहे. याची प्रोसेस देखील सोपी आहे. परंतु, कॉम्प्युटरवर स्क्रीनशॉट कसा काढायचा याची माहिती बऱ्याच जणांना नसते. परंतु, तुम्ही Window + Shift + S चा वापर करून स्क्रीनवर खास भागाचा स्क्रीनशॉट काढू शकता. हा स्क्रीनशॉट तुम्हाला कोणालाही सेंड करता येईल. ही शॉर्टकट की काम करत नसल्यास तुम्ही स्क्रीनशॉटसाठी press Alt+PrtScn, Windows Logo Key + PrtScn button आणि CTRL + Print Screen चा देखील वापर करू शकता. दरम्यान, या Shortcut Keys मुळे तुमचे काम देखील लवकर होईल व वेळ देखील वाचेल.

वाचा: OnePlus चा ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात आणा घरी, मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा डिस्काउंट, लगेच ऑफर्स पाहा

वाचा: सार्वजनिक ठिकाणचा वाय फाय वापरण्यापूर्वी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, मोठा फटका बसू शकतो

वाचा: परफेक्ट प्लान! २००० GB डेटा, फ्री कॉल्ससह OTT बेनिफिट्स आणि पहिल्या बिलावर ९० % ऑफ, पाहा डिटेल्स

Source link

Leave a Reply