लाल साडीतला बोल्ड Photo शेअर करणाऱ्या अभिनेत्रीचं गरोदरपणानंतरचं भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं का ?


मुंबई : शारीरिक सुदृढता आणि सध्याची पिढी यांची चांगलीच गट्टी पाहायला मिळते. पण, काही कारणास्तव याकडे दुर्लक्ष होतं. कामाचा व्याप, ठरवलेला दिनक्रम न पाळणं आणि अशा कैक कारणांमुळे Fitness चा मुद्दा दूर सारला जातो. पण, अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिनं शेअर केलेल्या काही पोस्ट पाहताना तुम्हालाही आपण सुदृढ आणि निरोगी असावं, सुंदर दिसावं त्याहूनही स्वत:वर प्रेम करावं असंच वाटेल. 

एका मुलाची आई असणाऱ्या उर्मिलानं अभिनय क्षेत्राकडून तिचा मोर्चा युट्यूबकडे वळवला. सोशल मीडियावर सध्या इन्फ्लुएन्सर, व्लॉगर अशी ओळख असणाऱ्या या उर्मिलानं काही दिवसांपूर्वीच तिचा एक फोटो शेअर केला होता. (Actress urmila nimbalkar shares weight loss journey and bold saree look)

फोटोमध्ये गरोदरपणाआधीची ती आणि गरोदरपणानंतर साधारण वर्षभराच्या काळात स्वत:वर मेहनत घेऊन पुन्हा तशीच (वर्षभरापूर्वीची सडपातळ ती) अशी दोन रुपं उर्मिलानं शेअर केली आहेत. 

संतुलित आहार, पुरेसा व्यायाम आणि सकारात्मतेची जाणीव देणारी ध्यानधारणा या साऱ्याच्या बळावर उर्मिलानं गरोदरपणात वाढलेलं वजन कमी केलं. यामध्ये तिची एकाग्रता आणि मेहनत प्रचंड महत्त्वाची भूमिका निभावून गेली. 

शरीराच्या दृष्टीनं महत्त्वाचं लक्ष्य साध्य केल्यानंतर उर्मिला पुन्हा नव्या जोमानं नव्या ध्येय्यप्राप्तीच्या दिशेनं पावलं टाकताना दिसली. तिनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. स्लिव्हलेस ब्लाऊज, कानात झुमके, कपाळावर ठसठशीत टिकली असा तिचा लूक अनेकांच्याच काळजाचा ठाव घेत आहे. ‘साहेब ती बाई लाल साडीत होती’, असं कॅप्शन तिनं तिच्या या पोस्टला दिलं आहे. 

उर्मिलाचा हा Fit And Fabulous लूक तुम्हाला कसा वाटला? Source link

Leave a Reply