लग्नात नववधुच्या प्रियकराची Entry, अखेर रक्ताने माखलेल्या शर्टातच घ्यावी लागली Exit


मुंबई : सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित भरपूर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे खूपच मनोरंजक असतात. हे व्हिडीओ कधी लग्नातील त्या महत्वाच्या क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ लग्नातील मजा मस्करीचे असतात. नेटकऱ्यांना हे लग्नातील व्हिडीओ पाहायला फार आवडतात. परंतु आता त्यापैकी एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर येईल, मात्र तुम्हाला दया देखील येईल. हा एका लग्नातील व्हिडीओ आहे. ज्याध्ये एक तरुण रक्ताने माखरेल्या कपड्यांमध्ये एका लग्नात एन्ट्री करतो आणि नववधूवर आपलं प्रेम असल्याचं सांगतो. परंतु नंतर ही नववधू असं काहीतरी करते, ज्यामुळे तुम्हाला या तरुणाची दया येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरमालाचा विधी सुरु असतो. नवरा आणि नवरी हातात वरमाला घेऊन उभे असतात. तेव्हा नवरदेव नववधूच्या गळ्यात हार घालतो आणि जेव्हा नववधू आपल्या नवऱ्याला वरमाला घालायला जाते, तेवढ्यात एका तरुणाची एन्ट्री होते.

या तरुणाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि त्याच्या शर्टावर लाल रंगाचे डाग आहे. हे डाग नक्की कसले आहेत हे नक्की माहित नाही परंतु ते रक्ताचे डाग असल्याचं म्हटलं जात आहे.

हा तरुण लग्नात येऊन सगळ्यांसमोर नववधूला थांबवतो आणि म्हणतो की, ” तुला कशाची भीती आहे? तु समाजाला किंवा कोणालाही घाबरु नकोस, माझ्यासोबत चल काजल आपण एकत्र संसार करु. प्रेमाने राहू.”

परंतु ही नववधू या तरुणाला उत्तर देत म्हणते की, “कोण आहेस तु, मी तुला ओळखतच नाही. तू इथून निघून जा.”

वधूचं हे वाक्य ऐकून तरुणाला खूप वाईट वाटतं, ज्यामुळे तो शांतच बसतो. खरंतर त्याला ज्या काजलला डोळे भरुन प्रेम करायचं असतं, ती त्याला ओळखतचं नाही हे, शब्द जेव्हा ती प्रियकराला म्हणते, तेव्हा त्याच्या भावना दुखावल्या गेला, ज्यामुळे तरुणाला फार वाईट वाटलं आणि त्याने तेथून काढता पाय घेतला.

हा व्हिडिओ sakhtlogg नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. परंतु हा व्हिडीओ खरा आहे की, लोकांच्या मनोरंजनासाठी तयार केला गेलेला आहे. हे कळलेलं नाही.या फोटोवर नेटीझन्सनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज देखील मिळाले आहेत.Source link

Leave a Reply