Headlines

लग्नानंतर सुष्मिता सेनच्या भावाने पत्नी चारू असोपाचा केला छळ; पतीच्या या कृत्यामुळे मोडलं लग्न?

[ad_1]

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री राजीव सेन आणि सुष्मिता सेनची सून चारू असोपा हिचं पती राजीव सेनसोबतचे बिघडलेले संबंध सध्या जोरदार चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. या सगळ्यामध्ये चारू असोपाने राजीवसोबतच्या तिच्या सगळ्या इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केल्या आहेत आणि आता इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून तिच्या बिघडत चाललेल्या नातेसंबंधाकडे लक्ष वेधलं आहे.

चारू असोपाने दिली ही रिएक्शन 
चारू असोपाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, “डिस्टंटमुळे नातेसंबंध नष्ट होत नाहीत. मात्र कमी बोलणं आणि उशीरा उत्तर दिल्याने परिस्थिती आणखी बिघडते.” चारूची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच पती राजीवच्या या कृत्यामुळे चारू आणि राजीवचं नातं लग्नाच्या टोकाला पोहोचलं असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

रिपोर्ट्सनुसार, चारू आणि राजीवमध्ये अनेक गोष्टींवरून मतभेद असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापैकी एक मुलगी जियानाचा चेहरा चाहत्यांना दाखवल्यामुळे त्यांच्यात वादाची ठिणगी पेटली असल्याचंही म्हटलं जात आहे. सुरुवातीला, जिथे चारूने तिच्या व्लॉग्समध्ये तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. तिथे चाहत्यांचं प्रेम आणि उत्साह पाहून चारूने तिच्या व्लॉग्समध्ये तिच्या मुलीचा चेहरा दाखवायला सुरुवात केली. जियानाचा चेहरा इतक्या लवकर उघड व्हावा. असं राजीवला वाटत नव्हतं. चारूने हे केलं तेव्हा दोघांमध्ये मतभेद झाले.

तिच्या व्लॉगमध्येही चारू याबद्दल बोलताना दिसत आहे आणि ती म्हणतेय की, तिला वाटत नाही की, तिच्या मुलीचा चेहरा दाखवल्याने ती दिसेल कारण जे प्रेम करतात ते तिला कधीच पाहत नाहीत. यासोबतच चारू म्हणाली की, काही लोकांचा असा विश्वास आहे की, तिने फॉलोअर्स मिळवण्यासाठी आणि हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी हे केलं होतं. ती याचा इन्कारही करताना दिसत आहे.

विविध प्रतिक्रियांमुळे चारू खूप नाराज झाली आहे आणि तिला तिच्या मुलीला शांततेत जगू द्या असं आवाहन करत आहे. चारूचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा असा विश्वास आहे की, व्हिडिओमध्ये ती राजीव सेनकडे बोट दाखवत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *