Headlines

लग्नानंतर मुलींनी करू नका ‘या’ ५ चूका, नाहीतर….

[ad_1]

मुंबई : इंटरनॅशनल वूमेन्स डे (International Women’s Day) च्या दिवशी महिलांसोबत सगळेच फार उत्साही असतात. पण हा उत्साह फक्त या दिवशीच नको तर ३६५ दिवस असायला हवा. महिला देखील आजच्या दिवशी स्वतःकडे लक्ष देतात. पण एरव्ही दुर्लक्ष करताना दिसतात. 

लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो. या बदलाला महिलांनी खूप व्यवस्थितपणे सामोरं जायला हवं. लग्नानंतर मुलींच आयुष्य बदलतं अशावेळी नेमकं कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. 

लग्नानंतर मुलींच्या आयुष्यातील बदलतात या ५ गोष्टी 

१. स्वतःच्या आनंदाकडे होतं दुर्लक्ष 

लग्नानंतर, स्त्रिया अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आनंदाकडे दुर्लक्ष करतात.  त्यांचं सगळं लक्ष कुटुंबाच्या आनंदावर लक्ष केंद्रित करतात. अशा प्रकारे मनाविरूद्ध आयुष्य जगणे योग्य नाही कारण पुढे ते आक्रमकतेचे रूप घेते. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करा.

२. योग्य पद्धतीने आपलं मत मांडणे 

अनेकदा असं होतं की, पती आपल्या पत्नीच्या गोष्टीकडे कानाडोळा करतो. याचमुळे महिला आपल्या समस्या किंवा आपलं म्हणणं योग्यपद्धतीने मांडत नाहीत. सर्वात पहिलं आपल्या जोडीदाराचा स्वभाव ओळखा. त्यामुळे स्वतःच्या चांगल्या बाजू ओळखा. 

३. आत्मनिर्भर व्हा…. 

भारतात अनेक ठिकाणी लग्नानंतर महिला आपल्या जोडीदारावर अवलंबून असतात. त्यामुळे आत्मनिर्भर व्हा. स्वतःचा खर्च, स्वतःच्या आईवडिलांकरता लागणारा पैसा स्वतः कमवा. लग्नानंतरही जॉब करा. कुटूंब ही स्त्रीची पहिली जबाबदारी असते. मात्र तरी देखील स्वावलंबी व्हा…. 

४. पैशांची गुंतवणूक न करणे 

अनेकदा महिला लग्नानंतर आपल्या पैशांकडे दुर्लक्ष करतात. मात्र भविष्यात पैसा महत्वाचा आहे. जर तुम्ही नोकरदार महिला असाल तर पगाराचा काही भाग बचतीसाठी ठेवा. जर तुम्ही गृहिणी असाल तर पतीने दिलेली काही रक्कम भविष्यासाठी वाचवता येईल, जेणेकरून अडचणी आल्यावर तुम्हाला कोणाकडून पैसे मागण्याची गरज भासणार नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *