लग्नानंतर Deepika ने नाही तरRanveer नं बदललं आपलं आडनाव? यावर काय म्हणाली अभिनेत्री पाहा


मुंबई : आपल्या सगळ्यांना हे तर माहितचं आहे की, अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दीपिका आणि रणवीरनं लग्न केलं. 14 नोव्हेंबर 2018 मध्ये हे दोन्ही स्टार कपल लग्न बंधनात अडकले. दीपिका-रणवीर लग्नाच्या आधीपासूनच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करायला कधीही मागे पुढे पाहायचे नाहीत. दीपिकाकडे एक स्टाईल आयकॉन म्हणून पाहिले जाते. परंतु रणवीर सिंग मात्र त्याच्या स्टाईलसाठी नेहमीच ट्रोल होत राहिला आहे.

दीपिकाचं रणवीरपूर्वी रणबीवर प्रेम होतं, या दोघांनी अनेक काळ एकमेकांना डेट केलं मात्र काही कारणामुळे ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली.

त्यानंतर दीपिका आणि रणवीरची  लव्हस्टोरी सुरु झाले. यांची लव्हस्टोरी संजय लीली भन्सालीच्या राम लीली या सिनेमापासून सुरू झाली. ज्यानंतर त्यांनी लग्न केलं.

आता या सगळ्यात म्हणजेच लग्नाच्या अनेक वर्षानंतर अशी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकीत झाले आहेत. आपल्याकडील परंपरेनुसार लग्नानंतर मुलीचे आडनाव बदलले जाते, परंतु इथे तर रणवीरनं दीपिकाचं आडनाव लावलं आहे.

आताच्या नवीन ट्रेंडनुसार मुली आपल्या आडनावापुढे नवऱ्याचं आडनाव लागतात. जसं की ऐश्वर्या राय लग्नानंतर तिचं नाव ऐश्वर्या राय बच्चन असं लावते.

बऱ्याचदा काही मुलींचं नाव आणि आडनाव ही त्यांची ओळख असते म्हणून त्या आपलं नाव बदलंत नाहीत. परंतु तुम्ही कधी मुलांनी त्यांचं आडनाव बदललेलं ऐकलं आहे? आता अशा बातम्या येत आहेत, ज्यामध्ये चर्चा आहे की, लग्नानंतर दीपिकाने नाही तर रणवीरनं आपल्या नावासमोर दीपिकाचं आडनाव लावलं.

खरंतर दीपिकाच्या वक्तव्यानंतर याप्रकारची चर्चा होऊ लागली आहे. एका मुलाखतीत दीपिकाने हे सांगितलं. ज्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करु लागला आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर deepikapadukoneslover या नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले होते की, दीपिका पदूकोन ही रणवीर सिंग पदूकोणची बायको आहे (Deepika Padukone Wife of Ranveer Singh Padukone ).

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दीपिका मुलाखतीत कोणाला तरी म्हणते की, मी तुला गेल्या वेळेला काय सांगितलं होतं? त्यावर मुलाखत घेणारी व्यक्ती म्हणते की तुच सांग. त्यावर दीपिका म्हणते की, मी दीपिका पदूकोण रणवीर सिंग पदूकोणची बायको आहे. अभिनेत्रीच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांनाच धक्काबसला आहे.

त्यामुळे रनवीरने खरंच आपल्या नावासमोर दीपिकाचं आडनाव लावलं का असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. परंतु तसे पाहाता दीपिका हे गंमतीनं देखील बोलली असावी, परंतु या मागील कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

दीपिका-रणवीर नेहमीच एकमेकांची खेचत असतात, त्यामुळे अभिनेत्रीनं हे गमतीनं बोललं असल्याची शक्यता नाकारता येत नाही.Source link

Leave a Reply