लग्नानंतर असं झालं विद्या बालनचं आयुष्य, अभिनेत्रीनं केला खुलासा


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्यानं आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विद्या बऱ्याचवेळा स्ट्रॉन्ग फीमेल भूमिका साकारताना दिसते. विद्यानं ‘कहानी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘लायनेस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी, अलीकडेच विद्यानं सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी विद्याचा अनफिल्टर लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. 

विद्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांसाठी ‘आस्क मी एनीथिंग’चं सेशन घेतलं. यावेळी विद्याचा अनफिल्टर लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यावेळी एका नेटकऱ्यानं कमेंट केली की ‘मुली काम करू शकत नाहीत’. यावर विद्याने उत्तर दिले, ‘तुम्ही मला सांगत आहात किंवा विचारत आहात.’ याशिवाय आणखी एका चाहत्याला प्रश्न पडला होता की लग्नानंतर नोकरी करणाऱ्या मुलींचे आयुष्य कसे बदलते? यावर अप्रतिम उत्तर देत विद्या म्हणाली, ‘पूर्वी मी काम करायचे, लग्नानंतर आम्ही काम करतो.’

त्यावेळी लाईव्ह सेशनमध्ये विद्या बालनला विचारण्यात आलं की महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार का दिला जातो? यावर विद्या म्हणाली, ‘मलाही या प्रश्नाचे उत्तर हवे आहे’. विद्या बालनला विचारण्यात आलं की, ‘लग्नानंतर माझं पतीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणं चुकीचं आहे का?’ तर अभिनेत्रीने उत्तर दिले, ‘नाही, अजिबात नाही, ती तिची निवड आहे. पण मला व्यक्तिशः असे वाटतं की कॉफीची चव तुम्ही स्वतः विकत घेतल्यावर चांगली होते.’

याशिवाय, या लाईव्ह सेशनमध्ये विद्या बालननं तिचा निर्माता पती सिद्धार्थ रॉय कपूर तिला घरच्या कामात कशी मदत करतो याबद्दल अनेक गोष्टी देखील सांगितल्या. विद्यानं लिहिले की, ‘हे आमचं घर आहे!’ विद्या बालन नेहमीच तिच्या विनोदी शैलीसाठी ओळखली जाते हे सर्वांना माहीत आहे. ‘बहुतेक कंपन्यांचे सीईओ पुरुष का असतात’, असे विचारले असता? तेव्हा विद्या म्हणाली, ‘मला असं वाटतं याचं कारण महिला कार्यालयात उशिरा येतात, असं असू शकतं.’ या प्रश्नांव्यतिरिक्त विद्या म्हणाली की, होम मेकर असण्यात काहीच गैर नाही. जर त्या मुलीला आनंद होत असेल तर, गृहिणी होऊन मुलांना मोठं करण्यात हरकत नाही. विद्या नुकतचं तिचा आगामी चित्रपट नीयतचं लंडनचं चित्रीकरण संपवून परतली आहे. Source link

Leave a Reply