लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर आई होणाऱ्या अभिनेत्रीच्या हाती दारूचा ग्लास? नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं


मुंबई : लग्नाला बरीच वर्षे उलटली तरीही आई होण्याचं सुख न मिळालेल्या अभिनेत्रीनं अखेर हा क्षण अनुभवला. आयव्हीएफच्या माध्यमातून तिनं एका बाळाला जन्म दिला. त्या क्षणापासून तिच्या आणि पतीच्या आय़ुष्यात आनंदाची उधळण होत आहे. तिचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता, ज्यामुळं चाहते, फॉलोअर्सही तिचं कौतुक करत होते. 

आता मात्र या अभिनेत्रीला यातचेच काहीजण झापताना दिसत आहेत. ही अभिनेत्री म्हणजे देबिना बॅनर्जी. गुरमीत चौधरी आणि देबिना ही अनेक चाहत्यांची आवडती जोडी. या जोडीच्या नात्यात बाळाच्या येण्यानं चाहत्यांनाही आनंद झाला. पण आता मात्र देबिनानं काहीजणांचा रोष ओढावला आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या देबिनानं नुकतंच काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये ही सेलिब्रिटी जोडी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. इथवर ठीक, पण ही जोडी सुट्ट्यांमध्ये इतकी बेधुंद झाली, की देबिनानं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हातात एका पेयाचा ग्लास घेऊन फोटो शेअर केला. (Bollywood Actress Debina Bonnerjee Trolled on holding liquor glass)

लेकिचा जन्मानंतर ही अल्कोहोल घेऊ लागली का, असा प्रश्न करत तिच्यावर काहीजणांनी संताप व्यक्त केला. काही कळतं का तुला… असं म्हणतही तिला अनेकांनी रागे भरलं. आपण शेअर केलेल्या फोटोवर येणाऱ्या या सर्व प्रतिक्रिया पाहता अखेर देबिनानं हातात असणाऱ्या ग्लासमध्ये मद्य नसून, हे स्पार्कलिंग वॉटर आहे असं स्पष्टीकरणही दिलं. 

सध्या मी पाणी पिऊनच वेळ मारून नेतेय असंही तिनं सांगितलं, तेव्हा कुठे तिच्यासाठी आलेल्या या संतापजनक प्रतिक्रिया कमी झाल्या. सोशल मीडियामुळं चाहते आणि फॉलोअर्सशीही सेलिब्रिटींची खास नातं तयार झालं आहे. त्यामुळं आपल्या आणि बाळाच्या काळजीपोटीच या प्रतिक्रिया असल्याचं म्हणत देबिनानंही ही बाब सकारात्मकरित्या घेतली. Source link

Leave a Reply