लग्नाआधीच बदललं ऋतिकच्या Girlfriend चं नाव? किस्सा एकदम ओके!


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सबा आझाद (Saba Azad) ही एक अभिनेत्री आहे. सबा आझाद ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आणि अभिनेता ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan)  रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सबाचं नाव ऋतिकसोबत जोडल्यानंतर तिला इंटरनेटवर सर्च करण्यात आलं. सबा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सबाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. सबा आझाद हे तिचं खरं नाव नाही. सबानं तिचं स्क्रिन नाव बदललं आहे. (hrithik roshan girlfriend saba azad real name rocket boyz sikh and muslim parents)

मीडिया रिपोर्टनुसार, सबाचं नाव सबा आझाद नाही तर सबा गरेवाल आहे. सबा तिच्या नावाबद्दल म्हणाली की, पासपोर्टवर तिचं नाव सबा गरेवाल आहे. माझे वडील शीख आणि आई मुस्लिम असल्याचं तिनं सांगितलं. पण दोघेही पारंपारिक पद्धतीनं धर्मावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्यांनी कधीही त्यांच्या विश्वास किंवा श्रद्धा माझ्यावर लादल्या नाहीत. मग सबानं तिच्या नावासोबत आझाद कसं लावलं? सबाच्या म्हणण्यानुसार, तिच्या आजीनं तिचं आझाद ठेवलं होतं. मला ते खूप आवडलं आणि माझं नाव सबा गरेवाल हे बदलून सबा आझाद केलं. पण आझादला तिच्या नावात जोडण्यापूर्वी सबानं तिच्या आजीची परवानगी घेतली होती.

आणखी वाचा : बॉलिवूडविषयी Bahubali फेम राम्याचं धक्कादायक वक्तव्य, दाक्षिणात्य कलाकारांना झालंय तरी काय?

आणखी वाचा : मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा ‘तो’ Topless फोटो पुन्हा व्हायरल!

दरम्यान, सबा ‘रॉकेट बॉईज’मध्ये या वेबसीरिजमध्ये सगळ्यात शेवटी दिसली. या वेब सीरिजमध्ये सबानं परवाना इराणीची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजनंतर सबाला सतत काम मिळतय. ऋतिकसोबत असलेल्या रिलेशनशिपची बातमीला सबानं दुजोरा दिलेला नाही. फक्त सबा नाही तर ऋतिकनंही मौन बाळगलं आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही सतत एकत्र दिसत आहेत. 

आणखी वाचा : फॅशन आयकॉन म्हणता म्हणता तोंडावर पडली मलायका; पाहा नेमकं काय घडलं

सबा आणि ऋतिक करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीला जेव्हा एकत्र हजर झाले तेव्हा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, सबा ऋतिकच्या कुटुंबासोबत बऱ्याचवेळा लंच किंवा मग डिनरला जाताना दिसली. सबाचा एक बॅंड ग्रुप आहे. Source link

Leave a Reply