लग्न झालेलं असतानाही अभिनेत्रींच्या प्रेमात पडले हे अभिनेते, यादीतील नावं धक्कादायक


मुंबई : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं मान्य असतं. ज्यामुळे लोक प्रेमासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवतात. असं काहीसं बॉलिवूड जोडप्यांसोबत देखील घडलं आहे. यामध्ये अशा काही बॉलिवूड अभिनेत्यांची नावं समोर आली आहेत. ज्याचं लग्न झालेलं असताना देखील, त्यांचं आपल्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबत देखील अफेअर्सच्या चर्चा समोर आल्या आहेत. काहींनी तर जगासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. तर काहींनी आपल्या बायकोला सोडून प्रेयसीसोबत लग्न देखील केलं आहे.

चला तर या जोडप्यांबद्दल जाणून घेऊ या.

Hrithik Roshan : हृतिक आणि सुझानच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण सुझानशी लग्न केल्यानंतरही जेव्हा त्याचे नाव कंगना राणौतसोबत जोडले गेले तेव्हा सगळेच थक्क झाले. हे प्रकरण इतके वाढले की, आज कंगना आणि हृतिक यावर कायदेशीर लढाई लढत आहेत. त्याचवेळी, या अफेअरमुळे सुझानने हृतिकपासून घटस्फोट घेतल्याचे देखील बोलले जात आहे. त्यानंतर आता सुझान आणि हृतिक दोघांनीही आता आपला जोडीदार निवडला आहे.

Akshay Kumar : अक्षय आणि प्रियांका चोप्राने अनेक चित्रपट एकत्र केले आणि याच दरम्यान त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. ज्यावेळी ट्विंकल खन्नाला ही बातमी समजली तेव्हा तिने अक्षयला स्पष्ट शब्दात धमकी दिली होती, या धमकीनंतर मात्र प्रियांका आणि अक्षय यांनी एकत्र काम केले नाही. तसेच ते एकमेकांसोबत कोणताही प्लॅटफॉर्म शेअर करताना दिसले नाही. 

Raj Kapoor : बॉलीवूड शो मॅन राज कपूर यांनी कृष्णाशी लग्न केले होते, ज्यांचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. पण असं म्हटलं जातं की, त्यावेळी राज कपूर अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वेडे होते. ते तिच्यावर फक्त प्रेम करत नव्हते तर तिला तिच्यासोबत सेटल व्हायचं होतं. पण नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केलं, ज्यामुळे त्याचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं.

Dharmendra : धर्मेंद्र करिअर करण्यासाठी मुंबईत आले तेव्हा त्यांचे लग्न झाले होते, पण जेव्हा ते हेमा मालिनी यांना भेटले तेव्हा तो तिच्या प्रेमात वेडे झाले. त्यामुळे हळूहळू हेमा देखील त्यांना पसंत करू लागल्या, दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्यासाठी प्रत्येक मर्यादा ओलांडली आणि विवाहित असल्यामुळे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी धर्म बदलून लग्न केलं आहे.

Sunny Deol : जेव्हा सनी देओलने बेताबमधून पदार्पण केले तेव्हा त्याचे लग्न झाले होते, पण त्यांने ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. त्यावेळी तो त्याच्या चित्रपटातील अभिनेत्री अमृता सिंगच्या प्रेमात होता. पण जेव्हा अमृताला त्याचं लग्न झाल्याचे समजले, तेव्हा तिने आपले पाय मागे घेतले. यानंतर सनीचे नाव डिंपल कपाडियासोबत जोडले गेले ज्याची आजपर्यंत चर्चा आहे.

Shahrukh Khan : शाहरुख खान त्याची पत्नी गौरीसाठी किती वेडा होता हे सर्वांनाच माहिती आहे, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉनच्या शूटिंगदरम्यान त्याचं आणि प्रियांकाच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या. परंतु जेव्हा गौरीलाही याची माहिती मिळाली, त्यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही.Source link

Leave a Reply