Laal Singh Chaddha Opening Day Box Office: पहिल्याच दिवशी ‘लाल सिंग चड्ढा’ची पडझड, पाहा कमाईचे आकडे


मुंबई : (Forest Gump) ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणारा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता (Aamir Khan) आमिर खानची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या आणि करीना कपूर (Kareena kapoor ) सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनाआधीपासूनच पाहायला मिळाली होती. 

पहिल्या दिवशी अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटानं जवळपास 10.25 ते 11.00 कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर ही एक अतिशय कमकुवत सुरुवात मानली जात आहे. 

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सुमारास संथगतीनं सुरुवात झाली असली तरीही घड्याळाचे काटे पुढे जात राहिले तसतसा कमाईचा आकडा वर जाताना दिसला. वाईटातल्या वाईट परिस्थितीतही Laal Singh Chaddha नं 15 कोटींची सुरुवात मिळवणं अपेक्षित होतं. पण, हाती आलेले आकडे घोर निराशा करणारे आहेत असं चित्रपट विश्लेषकांचं मत. 

चित्रपटाला सुरुवातील अपयश का? 
रक्षाबंधन, त्यानंतरची आठवडी सुट्टी, स्वातंत्र्यदिनानं पुढच्या आठवड्याची सुरुवात आणि त्यानंतरचं पारसी नववर्ष या सलगच्या सुट्ट्यांमध्येच आमिरचा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परिणामी चित्रपटाला अपेक्षित Kick Start मिळू शकलेला नाही. 

फक्त आमिरच नव्हे, तर अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’ (raksh bandhan) या चित्रपटालाही सलग सुट्ट्यांचा फटका बसताना दिसणार आहे. चित्रपट अभ्यासकांच्या मते या दोन्ही कलाकृतींच्या प्रदर्शनाच्या वेळा वेगळ्या असत्या तर मात्र चित्र सकारात्मक असतं यात शंका नाही. 

मोठी सुट्टी आल्यामुळं या वीकेंडला अनेकांचा कल चित्रपट गृहांकडे नसून पर्यटनस्थळांकडे जास्त असेल असं एकंदर वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. परिणामी आमिरनं जीव ओतून साकारलेला ‘लाल सिंग चड्ढा’ही तिथं फिका पडणार आहे. Source link

Leave a Reply