Headlines

कुणाला आठवडाभर अंघोळ करण्याचा कंटाळा, कुणाचे वडील बँक चोर… सेलिब्रिटींचे डार्क सिक्रेट्स हादरवणारे

[ad_1]

मुंबई : दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं… असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. कलासृष्टीसाठी ही म्हण पूर्णपणे लागू आहे असंच म्हणावं लागेल. कारण या झगमगाटाचा कितीही हेवा वाटत असला तरीही, काही गोष्टी समोर यायच्या त्या येतातच. 

हॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत असंच घडताना जगानं पाहिलं. या मंडळींच्या वाट्याला कमाल प्रसिद्धी, अमर्याद पैसा सर्वकाही आलं, पण त्यांच्या आयुष्यात भूतकाळानं मात्र पाठ सोडली नव्हती. चला जाणून घेऊया अशाच सेलिब्रिटींच्या आयुष्यातील काही Dark Secrets…. 

टॉबी मॅग्वायर- हा बराच लोकप्रिय अभिनेता. पण, असं म्हटलं जातं की त्याचे वडील बँक चोर होते. 1993 मध्ये टोबीच्या वडिलांनी रेसेडामधील एका बँकेत चोरी केली होती. 

Tobey Maguire, Sam Raimi leave 'Spider Man 4'

ब्रॅड पीट- ब्रॅ़ड पीट आता लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, त्याची पहिली नोकरी काय होती माहितीये? एल पोलो लोको रेस्तराँमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. जिथं कोंबड्याचे कपडे घालून पॅम्लेट वाटण्याचं काम करावं लागत होतं. 

Brad Pitt | DNA India

लिंजी लोहान – या अभिनेत्रीनं एका कार्यक्रमात खुलासा केला होता की, आपल्याला एक सावत्र बहिणही आहे. एशली हॉर्न असं तिचं नाव असून, 2012 मध्ये तिची ओळख समोर आली होती. हो पण, लिंजी आणि एशली यांची भेट मात्र अद्यापही झालेली नाही. 

Lindsay Lohan may get out of rehab early

क्रिस हेम्सवर्थ – अभिनेता क्रिस हेम्सवर्थला त्याच्या नावडत्या नोकरीविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यानं याबाबतचा खुलासा केला होता. आपण ब्रेस्ट मिल्कचा पंप साफ करण्याचं काम करत असल्याचा खुलासा या अभिनेत्यानं केला. या कामाचा आपल्याला प्रचंड तिरस्कार असल्याचंही त्यानं सांगितलं. 

Coronavirus scare: Chris Hemsworth's 'Extraction' team cancels promotion in  India

मेगन फॉक्स- अभिनेत्री मेगन फॉक्स हिनं एकदा असा खुलासा केला, की सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मी अनेकदा टॉयलेटला गेल्यावर फ्लश करायलाच विसरते असं मेगननं म्हटलं होतं. फक्त आपल्याच घरात नव्हे, इतरांच्याही घरात असंच घडतं असंही ती म्हणाली होती. 

Megan Fox | Zee News



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *