Headlines

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

बार्शी / प्रतिनिधी:येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिकारक विचारवंत,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक,थोर समाजसुधारक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बार्शी अकाऊंटंट रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष मा.उत्तमराव देशमुखे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा.नरेंद्र नलावडे,मा.बप्पासाहेब सुतार,मा.सतीशराव पाचकुडवे, मा.चंद्रकांतबापू वडेकर,वृक्षमित्र मा.सुनिलजी फल्ले आदी उपस्थित होते.


प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी त्यांच्या जीवनचरित्राची व कार्याची माहिती व्हावे या अनुषंगाने प्रतिमेसमोर ग्रंथालयातील शेतकऱ्यांचा असुड,गुलामगिरी,सार्वजनिक सत्यधर्म,म.फुले व आधुनिक महाराष्ट्र आदी उपलब्ध साहित्याची मांडणी केली होती.कार्यक्रमासाठी सभासद व वाचक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *