Headlines

कोरफडाचं सेवन कधी आणि कोणी करू नये? एकदा वाचाच

[ad_1]

Side Effects of Alovera : आपल्याला माहितीच आहे की कोरफडीचा वापर हा स्कीन केअर आणि हेअर केअरसाठी चांगलाच होतो. कोरफड हे एक चांगलं आयुर्वेदिक औषध आहे परंतु काही लोकांसाठी मात्र याचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच होईल. त्यातून कधीकधी याचा जास्त वापर केल्यानं अनेक समस्याही देखील उद्भवू शकतात. (this people should avoid having alovera otherwise can have major side effects)

कोरफडचेही अनेक साईड इफेक्ट्स आहेत. तर कोणत्या लोकांनी कोरफडचे सेवन करु नये आज हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिने याचे सेवन टाळावे कारण कोरफडाने गर्भाशयाच्या आकुंचन होण्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात ज्यामुळे गर्भपात आणि जन्म दोष यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

लहान मुलांनी कोरफडाचं सेवन करू नये. 12 वर्षांखालील मुलांना देखील कोरफड देऊ नये.

गॅसचा प्रोब्लेम असेल तर कोरफडाचे सेवन करू नका. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर कोरफडीचे सेवन टाळा यामुळे गॅसची समस्या वाढू शकते.

हार्ट पेशंटनी कोरफडापासून दूर राहावे कारण यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयाच्या समस्या असलेल्या रुग्णांनी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोरफडीचे सेवन करावे. कधीकधी याचा जास्त वापर केल्याने शरीरात एड्रेनालाईन हार्मोन जास्त प्रमाणात निर्माण होऊ शकतातसअशा स्थितीत हृदयाचे ठोके अनियमित होण्याची समस्या उद्भवू शकते. 

जर तुम्हाला आधी किडनी स्टोन झाला असेल तर कोरफड खाण्यापूर्वी नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्या. त्याचा जास्त वापर किडनीसाठी हानिकारक ठरू शकतो. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *