Headlines

कोणरे तू ? तू तर मच्छर…. पवारांविषयी केतकी चितळे काय बरळली

[ad_1]

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्त्वं अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांना फक्त राजकारणातच नव्हे, तर जनमानसातही मानाचं स्थान आहे. पण, याच नेत्याबद्दल त्यांच्याहून वयानं आणि अनुभवानंही लहान असणाऱ्या अभिनेत्रीनं आक्षेपार्ह वक्तव्य करत राष्ट्रवादी समर्थकांचा रोष ओढावून घेतला आहे. (Sharad Pawar)

फेसबुक पोस्ट करत केतकीनं सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. एरव्हीसुद्धा परखडपणे मतं मांडण्यासाठी आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी केतकीनं अजाणतेपणानं अनेकांच्या मनातील स्थान गमावलं. 

आतासुद्धा राजकीय वादाच उडी घेत आणि थेट पवारांविषयीच आपला रोष व्यक्त करत तिनं जे लिहिलं, ते पाहता केतकीला काही तारतम्य आहे का ? असाही सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे. (Ketaki chitale on sharad pawar)

केतकीनं पोस्टमध्ये काय लिहिलं? 
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर  मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन  फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l  तू तर लबाडांचा लबाड ll
हे शब्द तिनं पोस्टमध्ये लिहित त्याचं श्रेय अॅडव्होकेट नितीन भावे यांना दिलं. 

केतकीनं ही पोस्ट का केली असावी? 
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी साताऱ्यातील एका सभेमध्ये जवाहर राठोड यांची एक कविता सादर केली होती. या कवितेच्या माध्यामातून त्यांनी ब्राह्मण समाज आणि हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा सूर भाजपनं आळवला तर, तिथे केतकीनंही पवारांच्या याच सादरीकरणारा निशाणा केल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. 

तिची ही पोस्ट त्यांच्या साताऱ्यातील भाषणालाच अनुसरून असल्याची शक्यता अनेकांनीच वर्तवली आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *