Headlines

Kojagiri Pournima 2022: कोजगिरी पौर्णिमेच्या रात्री करा हे उपाय, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा

[ad_1]

Kojagiri Pournima 2022: हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावास्याचं महत्त्व आहे. कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी असतात अशी मान्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेकडे(Kojagiri Pournima) सर्वांचं लक्ष लागून आहे. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रविवारी सकारी 3 वाजून 41 मिनिटांनी सुरु होईल आणि 10 ऑक्टोबरला सकाळी 2 वाजून 25 मिनिटांपर्यंत असेल. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची 16 कलांमध्ये छाया पडते. त्यामुळे चंद्राच्या शीतल प्रकाशाखाली खीर ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसाद म्हणून खाल्ली जाते. 

चंद्र प्रकाशातून रात्रभर अमृत वर्षाव होतो, अशी समज आहे. त्यामुळे ही खीर खाल्ल्याने चांगलं आयुष्य आणि आरोग्य मिळतं. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा खास असते. चंद्र प्रकाशात खीर ठेवण्यासाठी 9 ऑक्टोबरची रात्र महत्त्वाची असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुरटीचे काही उपाय करू शकता. चला तर जाणून घेऊयात या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत.

-तुरटीचा रंग पांढरा असतो. ज्योतिषशास्त्रात पांढरा रंग चंद्राशी निगडीत मानला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एका बालदीत पाणी घेऊन त्यात तुरटी टाका आणि चंद्र प्रकाशाखाली ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या पाण्याने आंघोळ करा. यामुळे आजार दूर होतात अशी मान्यता आहे.

Diwali 2022: दिवाळीत ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, देवी लक्ष्मीची असेल विशेष कृपा! 

-कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुरटीची पावडर पांढऱ्या कपड्यात बांधून आपल्या दंडाला बाधा. असं केल्याने अडकलेली कामं मार्गी लागतात. तसेच प्रत्येक कामात यश मिळतं. 

-कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुरटीचा एक तुकडा पांढऱ्या कपड्यात बांधून पाकिटात ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. 

-एखादी व्यक्ती आजारी असल्यास रुममध्ये काचेच्या वाटीत तुरटी आणि एका वाटीत मिठ भरून ठेवा. यामुळे रुममध्ये सकारात्मक उर्जा तयार होते आणि रुग्णाला बरं वाटतं. 

(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामन्य मान्यता आणि माहितीच्या आधारे दिली आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *