कोहलीच्या ‘त्या’ अजब कॅचवर अनुष्का आणि रिकी पाँटिंगने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ


मुंबई : आयपीलमध्ये बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. 27 व्या सामन्यात दिल्ली विरुद्ध 16 धावांनी बंगळुरू टीमने विजय मिळवला. आयपीएलमध्ये बंगळुरूचा हा चौथा विजय आहे. 

बंगळुरू टीमच्या फलंदाजीमध्ये विराट कोहलीला अजूनही म्हणावं तेवढं फलंदाजीमध्ये यश मिळत नाही. विराट 12 धावा करून तंबुत परतला. मात्र फिल्डिंग दरम्यान किंग कोहलीनं आपलं कौशल्य दाखवलं त्याचं कौतुक सगळीकडे होत आहे. 

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला आऊट करण्यासाठी कोहलीनं चक्क उडी मारून अजब कॅच घेतला. या कॅचनंतर रिकी पाँटिंग यांचा चेहरा उतरला होता. तर अनुष्का शर्मा कोहलीची पत्नी हैराण झाली. कोहलीनं अजब कॅच पकडल्याचं पाहून ती खूप खूश देखील झाली. या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दिल्लीची फलंदाजी सुरू असताना 17व्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतला मोहम्मद सिराजच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा शॉट खेळायचा होता, पण विराट कोहलीनं हवेत उडी मारून कॅच पकडला. 

पंत कव्हर्सवर शॉट खेळत होता, पण कव्हर्सच्या दिशेने असलेल्या कोहलीने हवेत उडी मारली आणि एका हाताने कॅच घेतला. कोहलीने त्याच्या फिटनेसचे पुन्हा प्रदर्शन केले. त्याच्या अजब कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली विरुद्ध सामन्यात कोहलीने चांगली सुरुवात केली. मात्र 14 बॉलमध्ये 12 धावा काढून तो रन आऊट झाला. कोहली या हंगामात आतापर्यंतच्या मॅचमध्ये दुसऱ्यांदा रनआऊट झाला.Source link

Leave a Reply