केएल राहुलच्या लखनऊ सुपरजायंट्सला मोठा धक्का, आयपीएल 2022 मधील सर्वात घातक गोलंदाज ‘आऊट’


IPL 2022 : आयपीएलचा (IPL) पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, सर्व दहा संघ जय्यत तयारीनिशी सज्ज झाले आहेत. पण अशातच आयपीएलमधला नवा संघ लखनऊ सुपर जायंट्ससाठी एक वाईट बातमी समोर आहे. 

केएल राहुलच्या (kl rahul) नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स (lucknow supergiants) संघाचा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज जखमी झाला आहे. या वेगवान गोलंदाजाला संघाने 7.5 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. पण हा गोलंदाज आता आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

आयपीएलमधून बाहेर झाला घातक गोलंदाज
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (mark wood) हाताच्या दुखापतीमुळे आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मधून बाहेर पडला आहे. गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वुडच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. त्या दुखापतीतून वुड अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये तो खेळू शकणार नाही. नॉर्थ साऊंड इथं वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात वुडला केवळ 17 षटके टाकता आली. 

7.5 करोडची लागली होती बोली
गेल्या महिन्यात झालेल्या खेळाडूंच्या लिलावात वुडला आयपीएलमध्ये नव्याने उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाने 7.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. केएल राहुल सुपर जायंट्सचा कर्णधार आहे आणि अँडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक आहे. मार्क वुडने आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त एकच सामना खेळला आहे. 2018 मध्ये, वुड धोणीच्या चेन्नई सुपरि किंग्सकडून खेळला होता.

लखनऊ सुपर जायंट्ससमोर आव्हान
IPL 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा पहिला सामना 28 मार्चला गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. साखळी गटात लखनऊचा संघ गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज प्रत्येकी एक सामना खेळेल.

लखनऊ सुपर जायंट्सचा संघ
केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस, रवि बिश्नोई, मयांक यादव, एविन लुइस, आवेश खान, जेसन होल्डर, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, दीपक हुड्डा, करण शर्मा, काइले मेयर्स, आयुष बडोनी, मोहसिन खान, मनन वोहरा, शाहबाज नदीम, दुशमंता चमीरा, कृष्णप्पा गौतम आणि अंकित राजपूत.Source link

Leave a Reply