किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video


Ira Khan Nupur Shikhare  Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधीच आयरा आणि तिचा प्रियकर, (Celebrity Fitness trainer) सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेनं साखरपुडा केला. (Ira Khan Nupur Shikhare) आमिरच्या लेकिच्या साखरपुड्यासाठी बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये आमिरची Ex Wife किरण राव, भाचा इम्रान खान, आशुतोष गोवारिकर, फातिमा सना शेख आणि इतर मित्रपरिवाराचा समावेश होता. सोशल मीडियावर या सोहळ्यातील बरेच व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळाले. (ira khan nupur shikhare gets trolled on sharing new engagement Video )

आता मात्र खुद्द आयरानंच तिच्या इन्स्टाग्राम (Ira khan instagram) अकाऊंटवरून एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा आणि नुपूर एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. ही पोस्ट करताना आयरानं सुरेख असं कॅप्शनही लिहिलं. 

 

‘तो क्षण….
बऱ्याच कार्यक्रमांना बरेचजण मला म्हणाले की मी चांगली पार्टी देते, त्यांनी मला बरंच श्रेय दिलं. माझ्या आणि इतरांच्या पार्टीमध्ये असणारा एक फरक म्हणजे पाहुण्यांची यादी’, असं लिहित आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या क्षणी हजर राहिलेल्या प्रत्येकाप्रती तिनं कृतज्ञता व्यक्त केली. 

अतिउत्साहामुळं तोंडघशी पडली… 

आयरानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिनं कोणतंही गाणं वगैरे जोडलेलं नसून, त्या क्षणी झालेला कल्लाच सर्वांच्या भेटीला आला आहे. पण, या साऱ्यामध्ये आयरा आणि नुपूरचा अतिउत्साहीपणा चांगलाच नडल्यालं दिसत आहे. 

अंगठीच्या Box मधून ती काढण्यापासून एकमेकांच्या हातात ती घालण्यापर्यंत आणि त्यानंतर उगाचच डान्स वगैरे करण्यापर्यंत आयराचा आणि काही अंशी नुपूरचा ओसंडून वाहणारा आनंद नेटकऱ्यांना काही पटलेला नाही. ‘किती Overacting… ‘, असं म्हणत ज्या फॅनपेजवरून हा व्हिडिओ रिशेअर झाला तिथेही आयराला हिणवण्यात आलं. तुमचं या व्हिडीओबाबत काय मत? 

Video पाहून ठरवा…! Source link

Leave a Reply