kirit somaiya replied to uddhav thackeray on amit shaha criticism spb 94शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह मुंबईत आले आणि त्यांनी शिवसेनेला मुंबईत जमीन दाखवा, असं विधान केलं. त्यांनी आम्हाला जरूर जमीन दाखवावी, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिका ही माफियांचा अड्डा झाला असून हा अड्डा आम्ही उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”; नितेश राणेंनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ सेकंदांचा ‘तो’ Video

काय म्हणाले किरीट सोमय्या?

“उद्धव ठाकरेंची शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली, तरी यावेळी आम्ही मुंबई महापालिका जिंकणार आहे. मुंबई महापालिका ही माफियांचा अड्डा झाला आहे. हा अड्डा आम्ही उद्धस्त केल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

हेही वाचा – मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे शिंदे सरकारचे संकेत; शंभूराज देसाई म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”

“आमच्यासाठी उद्धव ठाकरे नाही तर मुंबईचे खड्डे, मुंबईचे नाले, गटारं, कचरा व्यवस्थापन हे विषय महत्त्वाचे आहे. मुंबई मनपात माफियांचे अड्डे झाले आहेत. हा भ्रष्टाचार आम्हाला संपवायचा आहे. तसेच मुंबईकरांना अभिमान वाटावा, असं शहर आम्हाला निर्माण करायचं आहे.त्याला कोणीही अडवायचा प्रयत्न केला, तरी मुंबईचा कचरा साफ करण्याची जबाबदारी मुंबईकर आम्हाला देणार आहेत”, असेही ते म्हणाले.Source link

Leave a Reply