किंकाळ्या फोडत बप्पी लहरींच्या पार्थिवामागे लेक धावली; ती दृश्य काळजाचं पाणी करणारी


मुंबई : प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. त्यांना ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनिया आणि चेस्ट इन्फेक्शन झालं होतं. 

ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होते. बप्पी दा यांनी आपल्या मुलीच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या मुलीनेचं बप्पी लहरी यांच्यासोबत शेवटचा संवाद साधला होता.

वडिलांच्या निधनाचा रिमाला मोठा धक्का बसला आहे. तिची अवस्था अगदी वाईट झाली आहे. रीमाचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती खूपच रडताना दिसत आहे.

बप्पी लहरी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार पार पडले.  बप्पी लहरी यांचा मृतदेह नेताना पाहून त्यांच्या मुलीला रडू कोसळले. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बप्पी दा यांच्या अखेरच्या प्रवासाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांचे पार्थिव शववाहिनीच्या दिशेने नेले जात आहे. त्यांना शेवटचा निरोप देताना मुलगी रीमाची अवस्था वाईट झाली आहे.

तिचीही प्रकृती बिघडली आहे. बप्पी दा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन शेअर केले होते.

बुधवारी 16 फेब्रुवारीला बप्पी दा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. कारण त्यांचा मुलगा अमेरिकेत होता. तो कुटुंबासह मुंबईला परतण्याची वाट पाहिली जात होती. अखेर 17 फेब्रुवारीला सकाळी तो कुटुंबासह मुंबईत परतला. त्यानंतर विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.Source link

Leave a Reply