‘खेळण्यापूर्वी तो 2 तास माझ्यासोबत…’; सेक्सबाबत प्रश्न करताच खेळाडूच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा


मुंबई : खेळ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगल्या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतो / दिसते. जीममध्ये घाम गाळणं असो, खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष देणं असो किंवा मग शारीरिक क्षमतेची चाचणी घेणारी कामं असो. हे खेळाडू त्यांच्या या परीक्षांपासून मागे हटत नाहीत. 

एक खेळाडू मात्र असा आहे, जो चांगल्या प्रदर्शनासाठी जे काही करतो ते बहुधा कुणी करत नसावं. त्याच्या पत्नीनंच याबाबतचा खुलासा केला आहे. एका युट्यूब शोदरम्यान तिनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांनाच धक्का बसला. (basket ball player Janis Timma Anna Sedokova bedroom secret revealed)

बास्केटबॉलपटू जेनिस टिम्मा याच्या पत्नीनं हल्लीच एका युट्यूब शोदरम्यान, लग्न आणि खासगी आयुष्यावर वक्तव्य केलं. इतक्या व्यग्र वेळापत्रकातही तू आणि पती एकमेकांना वेळ कसा देता? असा प्रश्न केला असता जेनिसची पत्नी, अॅना सेदकोवा हिनं जरा स्पष्टच उत्तर दिलं. 

‘आमच्यात 15 मिनिटं नव्हे, 2 तास शारीरिक संबंध असतात, हे खरंय. यामुळं टिम्माला खेळात चांगलं प्रदर्शन करण्यासाठी मदत होते. कारण तो मानसिकदृष्ट्या सक्षम असतो’, असं ती म्हणाली. 

कधीकधी मला वाटतं की हे सर्व (सेक्स) 15 मिनिटांतच संपावं, पण ते किमान 2 तास सुरुच असतं, असंही तिनं सांगितलं. 

कोण आहे जेनिसची पत्नी? 
अॅना सेदोकोवा युक्रेनची लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री आहे. तिनं आपल्याहून वयानं 10 वर्षे लहान असणाऱ्या जेनिस टिम्मा या खेळाडूशी लग्न केलं. हे तिचं तिसरं लग्न असल्याचं सांगण्यात येतं. Source link

Leave a Reply