Headlines

खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…” | Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut Ex CM on Claim on Shivsena by Rebel Eknath Shinde Group scsg 91

[ad_1]

शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.  निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहे. असं असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विषयावरुन आम्हाला शिवसेनेसंदर्भात पुरावे देण्याची गरज नसून मतदारच बंडखोरांना निवडणुकीच्या रिंगात पुरुन टाकतील असा टोला लगावलाय. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नक्की वाचा >> भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

“निवडणूक आयोगासमोर नवा खटला उभा राहतोय. तो म्हणजे धनुष्यबाण कोणाचा?” असा प्रश्न राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “मला अजूनही देशाच्या घटनेवर, कायद्यावर विश्वास आहे. चोरीमारी सगळीकडे चालते असं माझं मत नाही. नाहीतर तुम्हाला सत्यमेव जयते हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि दोन वाक्य करावी लागतील एकाची. एक तर असत्यमेव जयते आणि दुसरं सत्तामेव जयते. त्यामुळे सत्तामेव जयतेसमोर असत्य घेऊन तुम्ही जाणार असाल तर लोक ते मान्य नाही करणार,” असं म्हणाले.

नक्की वाचा >> “बंडखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि…”; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान

पुढील प्रश्न विचारताना राऊत यांनी, “हे दुर्देव आहे महाराष्ट्र असं मला वाटतं पण आज अशी वेळ आणली आहे की ठाकरेंना पुरावे द्यावे लागतात की शिवसेना खरी किंवा खोटी,” असं म्हटलं. त्यावर माजी मुख्यमंत्र्यांनी, “लोक वाट बघतायत निवडणुकांची. आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही. निवडणुका येऊ दे यांनाच पुरुन टाकतो असं लोक म्हणतायत. जनताच त्यांना राजकारणात पुरुन टाकेल,” असा विश्वास व्यक्त केला.

नक्की वाचा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय

पाहा मुलाखत –

“अशाप्रकारची फूट याआधी राणे-भुजबळांनाही पाडता आली नव्हती. असं का घडलं?” असा थेट प्रश्न राऊत यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव यांनी, “ज्यांना मी अधिकार दिले होते. त्यावेळी लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते पण मला कुजबूज ऐकू येत होती की, अरे काय मुख्यमंत्री? नगसविकास खातं मुख्यमंत्र्याकडे असायला पाहिजे. मलाईदार खातं म्हणतात. मी मलाई वगैरे खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे सामान्य प्रशासन, न्याय व विधी खाती ठेवली होती. आयटीमध्ये मला सगळ्या खात्यांमध्ये तंत्रज्ञान वापरता येईल का हा एक माझा विचार होता. काही काळ एका मंत्र्याने दिवे लावले म्हणून त्यांचं खातं मला थोडा दिवस माझ्याकडे ठेवावं लागलं होतं,” असं उत्तर देत आपण बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यावर अधिक विश्वास टाकल्याचं सूचित करण्याचा प्रयत्न केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *